काळे गट

पाच नंबर साठवण तलाव जलपूजन कोपरगाव शहराच्या विकासाचा अरुणोदय – धरमचंद बागरेचा

पाच नंबर साठवण तलाव जलपूजन कोपरगाव शहराच्या विकासाचा अरुणोदय – धरमचंद बागरेचा

पाच नंबर साठवण तलाव जलपूजन कोपरगाव शहराच्या विकासाचा अरुणोदय – धरमचंद बागरेचा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ सप्टेंबर २०२४ :- आश्वासन आणि वचन हे राजकारणाचे मुलभूत अंग आहेत. राजकीय जीवनात जनतेला दिलेली आश्वासने राजकीय व्यक्तींना ज्ञात राहतातच असे नाही किंवा ज्ञात असतांना देखील हि वचने आणि आश्वासने किती पाळली जातात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी निवडून येताच त्यासाठी पाठपुरावा करून पूर्ण करणारे देखील मोजकेच असतात. त्यापैकी आ.आशुतोष काळे हे एक असून त्यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे कोपरगावकरांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. त्यामुळे कोपरगावकरांचे नियमित व स्वच्छ पाणी हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असून त्यानिमित्ताने कोपरगाव शहराच्या विकासाचा खऱ्या अर्थाने अरुणोदय होणार असल्याचे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरीटेबलचे सचिव धरमचंद बागरेचा यांनी म्हटले आहे.

जाहिरात

आ.आशुतोष काळेंच्या कल्पक नेतृत्वातून कोपरगाव शहराचा साडे चार वर्षात रस्ते, आरोग्य, शहर सुशोभिकरण व मुलभूत गरजा पूर्ण होवून झालेला नेत्रदीपक विकास डोळ्यांना सुखावणारा आहे. त्याला जोड ५ नंबर साठवण तलावाची मिळणार असून यापुढील काळ हा फक्त आणि फक्त कोपरगावच्या विकासाचाच राहणार आहे. कोपरगाव शहराच्या विकासाचे अर्थकारण हे संपूर्णतः पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर अवलंबून होते. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर दूरगामी परिणाम झाले होते. तर दुसरीकडे नागरिकांना दहा-बारा-सोळा दिवसांनी नळाला येणारे पाणी प्लास्टिकच्या टाक्यात साचवून ठेवून पुढील पाणी येईपर्यंत जपून जपून वापरल्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. कोपरगाव शहरातील प्रत्येक घरासमोर नागरिकांचे स्वागत करणाऱ्या ह्याच प्लास्टिकच्या टाक्यांनी आ. आशुतोष काळेंचे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कोपरगावकरांना दिले.

जाहिरात

 लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी साठा मंजूर असतांना देखील साठवण क्षमता नसल्यामुळे पुरेसा पाणी साठा होत नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या ५ नंबर साठवण तलावासाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र निवडून येताच आ.आशुतोष काळे यांनी याच ५ नंबर साठवण तलावाला आपले ड्रीम प्रोजेक्ट करून केलेल्या अथक पाठपुराव्याची फलनिष्पत्ती पूर्णत्वाकडे जात असून लवकरच ५ नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगावकर ज्या दिवसांची मागील अनेक दशकांपासून चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस कोपरगावकरांच्या आयुष्यात उगवणार असून हा दिवस कोपरगावच्या विकासाचा खऱ्या अर्थाने अरुणोदय होणार असल्याचे धरमचंद बागरेचा यांनी म्हटले आहे.

धरमचंद बागरेचा

 आ. आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचा कोपरगाव शहरातील प्रत्येक छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत व गृहिणीपासून ते सरकारी कर्मचारी असणाऱ्या माता भगिनींना या साठवण तलावाचा फायदा होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे बाजारपेठेची झालेली दुरावस्था छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी व पाण्यासाठी भेडसावणारी चिंता माता भगिनींनी अनुभवली आहे. परंतु ह्या ड्रीम प्रोजेक्टचे अर्थात ५ नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते होणारे जलपूजन कोपरगावच्या इतिहासतील ऐतिहसिक घटना ठरणार आहे.-मनोज बिडवे (जिल्हाध्यक्ष नाभिक संघ)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे