आपला जिल्हा

उद्या रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे आयोजन

उद्या रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे आयोजन
उद्या रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे आयोजन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ मे २०२४कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध जागृत ठिकाण असलेल्या रेल्वे नारंदी पुलाजवळील श्री रामशिंग बाबांचा सालाबादप्रमाणे याही वर्षी जंगी यात्रा उत्सव बुधवार दि ८ मे रोजी विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने आयोजित केला असल्याची माहिती श्री रामशिंग बाबा जंगी यात्रा उत्सव आयोजकांच्या वतीने सांगितले आहे.

जाहिरात
या विषयी श्री रामशिंग बाबा जंगी यात्रा उत्सव आयोजकांच्या वतीने दिलेल्या अधिक माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गाव हद्दीतील रेल्वे स्टेशन नारंदी पुलाजवळ असलेल्या श्री रामशिंग बाबांचा यात्रा उत्सव बुधवार ८ मे २०२४ रोजी आयोजित केला असून सकाळी ७ वाजता देवाला गंगास्नान, ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ४ वाजता श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी समाधी आश्रमाचे मठाधिपती प.पु रमेशगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट होणार आहे तर दुपारी ४ वाजता वारी शिंगवे येथील ह.भ.प प्रतीक्षाताई जाधव महाराज यांचे हरिकीर्तन होणार असून दुपारी १२ वाजेपासून  उपस्थित सर्वच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून तरी जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रा उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन श्री रामशिंग बाबा जंगी यात्रा उत्सव आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे