आपला जिल्हा
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक मतदान स्पर्धेचे आयोजन- मुख्याधिकारी जगताप
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक मतदान स्पर्धेचे आयोजन- मुख्याधिकारी जगताप

कोपरगाव विजय कापसे दि ९ मे २०२४- कोपरगाव शहरातील गणपती व दुर्गादेवी उत्सव मंडळे, सार्वजनिक व्यायाम शाळा, सामाजिक संस्था, विविध क्लब, रहिवासी कॉलनी व बचत गट आपणास आवाहन करण्यात येते की दि.१३ मे २०२४ सोमवार रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान होणार आहे. त्यादिवशी आपण आपल्या भागातील मतदान केंद्राची निवड करून तेथे ७५% च्या पुढे मतदान कसे होईल याकरिता प्रयत्न करावेत. ज्या मतदान केंद्रावर ७५% पेक्षा जास्त मतदान होईल त्या पहिल्या ३ मतदान केंद्राकरिता रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र कोपरगाव नगरपरिषदेमार्फत देण्यात येईल अशी माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी सांगितले आहे.






