व्हाट्सअप्प ग्रुप द्वारे दोनशेहून अधिकचे विवाह जमविणारे माजी सरपंच कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर
दोनशेहुन अधिकचे विवाह जमविणारे माजी सरपंच कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर
आज पर्यंत २०० हुन अधिक विवाह व्हाट्सअप्प द्वारे जमविले

कोपरगाव विजय कापसे दि २६ मे २०२४– कोपरगाव तालुक्यातील सुरेगावचे माजी सरपंच तथा पत्रकार सचिन मीरा नामदेव कोळपे यांना नुकताच दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय मानाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल त्यांचा वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सचिन मीरानामदेव कोळपे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भीमराज महादू जुंधारे यांच्या सोबतीने धनगर समाजातील वधू-वरांसाठी ७ हजार सभासद संख्या असलेला सोशल मीडियाचा व्हाट्सअप ग्रुप मागील वर्षी यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांच्या प्रेरणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू केले असून आजपर्यंत त्यांनी या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून समाजातील २०० पेक्षा अधिक लग्न जमवले आहे ही कौतुकास्पद बाब असून विशेष म्हणजे या कामासाठी व्हाट्सअप ग्रुपचे चालक सचिन कोळपे व जुंधारे हे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.

याच त्यांच्या समाजपयोगी कार्याची दखल घेऊन ध्यास परिवर्तनाचा विचार लोकशाहीचा या ब्रीदवाक्यानुसार संपादक बाळकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध राज्यभर कार्य करत असलेल्या दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने सचिन कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर केला असल्याचे पत्र आयोजक तथा कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.





