सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची औद्योगिक व शैक्षणिक सहल

सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची औद्योगिक व शैक्षणिक सहल
सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची औद्योगिक व शैक्षणिक सहल

कोपरगाव विजय कापसे दि १६ जानेवारी २०२६–कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या औद्योगिक व शैक्षणिक सहलीचे आयोजन १२ व १३ जानेवारी रोजी करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉक्टर विजया गुरसळ यांनी दिली.संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीदशेतच व्यवसायाची आवड निर्माण होऊन भविष्यात व्यवसाय क्षेत्रात यशस्वी करिअर घडावे या दृष्टीने महाविद्यालयाच्या वतीने वाणिज्य मेळाव्याचे आयोजन औद्योगिक सहलीचे आयोजन, विविध तज्ञांची व्याख्याने याद्वारे प्रयत्न केले जातात.

पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्यासाठी औद्योगिक सहल मोठी कामगिरी बजावत असते. हाच उद्देश घेऊन सौ सुशीलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना वाई येथील मॅप्रो या कंपनीतील प्रक्रिया, उत्पादन, विक्री अशा विविध विभागांच्या भेटीद्वारे प्रत्यक्ष उत्पादन तंत्रज्ञान, मालाची प्रक्रिया ते विपणन,विक्री यातील सर्व टप्पे तसेच कामाच्या ठिकाणाचे वातावरण याबाबतचा अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच धार्मिक स्थळे, भौगोलिक विविधता यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जीवनाचा आनंद अनुभवता यावा याकरिता एकवीरा देवी, पालीचा गणपती, दिवे आगर समुद्रकिनारा अशा ठिकाणांना देखील भेट दिली.

तसेच या सहलीदरम्यान महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास, संस्कृती, यांचे महत्त्व आणि जाणीव करून देण्यासाठी ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापनेची आणि रायगडाच्या अस्मितेची रोमहर्षक व जिवंत साक्ष या भेटीतून विद्यार्थ्यांच्या मनाला भिडली. 
या सहलीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून व्यवहार ज्ञान,संघभावना व सामाजिक जाणीव विकसित होण्यास मदत होणार आहे. सहलीदरम्यान वाणिज्य शाखेचे प्राध्यापक नंदकिशोर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. हरिभाऊ कोळपे,प्रा.डॉ. पल्लवी मोरे, व प्रा. ऐश्वर्या शिंदे हे प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. या सहलीसाठी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. सौ.विजया गुरसळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



