सोने चांदीच्या दागिन्यांचे चांदुकाका सराफ यांचे अनोखे प्रदर्शन- पुष्पाताई काळे
कोपरगाव यथे महिलांची प्रदर्शन बघण्यास लक्षणीय गर्दी
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १४ जुन २०२५– सोन्या-चांदीच्या क्षेत्रात नावाजलेल्या चंदूकाका सराफ यांनी कोपरगाव शहरात भरविलेले सोन्याच्या आकर्षक दागिन्यांचे प्रदर्शन हे अत्यंत अनोखे असल्याचे गौरोवोद्गार प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सर्वेसर्वा पुष्पाताई अशोकराव काळे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
जाहिरात गौतम
भारतातील सुप्रसिद्ध श्री चंदूकाका सराफ यांच्या सुवर्ण अलंकाराच्या ४ दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि १३ जुन रोजी कृष्णाई बँक्वेट हॉलमध्ये गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका तसेच प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई अशोकराव काळे यांच्या शुभहस्ते तर समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे, उद्योजक कैलास ठोळे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, जैन दिगंबर समाजाचे अध्यक्ष अजित लोहाडे, जेष्ठ नागरिक मंचाच्या सुधाभाभी ठोळे, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, कृष्णाई बँक्वेटचे चंद्रकांत देशमुख, योगाचार्य उत्तमभाई शहा, समृद्धी शहरस्तर व्यवस्थापक हर्षा पाटील, , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार, माजी पंचायत समिती सदस्या स्वप्नजा वाबळे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, माजी नगरसेविका वर्षा गंगुले, मंगल आढाव, हर्षाली कांबळे, प्रेमचंद गंगवाल, हेमा तवरेज, प्रेमा बंब, संगिता बंब आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.जाहिरात
या प्रसंगी चंदूकाका सराफ यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर पुढे पुष्पाताई काळे यांनी बोलताना सांगितले की, १८२७ पासून भारतातील सर्वात विश्वासनिहाय आणि सर्वात जुने दागिन्याचे ब्रँड असलेले चंदूकाका सराफ यांनी कोपरगाव मध्ये आयोजित केलेले सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचे प्रदर्शन हे अत्यंत अनोखे व कोपरगावकरांसाठी पर्वणी ठरणारे असून कोपरगावकरांना यामुळे नक्कीच नवनवीन दागिन्याच्या डिझाईन उपलब्ध झाल्या आहे तर जास्तीत जास्त कोपरगाव करांनी ही सोन्याची दागिने खरेदी करावी यासाठी वेगवेगळ्या योजना देखील सुरू केल्या आहे तरी जास्तीत जास्त कोपरगावकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पुष्पाताई काळे यांनी केले असून प्रदर्शन यशस्वीतेसाठी चांदुकाका सराफ यांच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत आहे.जाहिरात