आपला जिल्हा

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करा : बाळासाहेब थोरात

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करा : बाळासाहेब थोरात

जवळेकडलग येथे पवार कुटुंबीयांची सांत्वन भेट; वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६ : जवळेकडलग येथील अकरा वर्षीय कृष्णा वसंत पवार याचा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वाढत असलेले बिबट्यांचे हल्ले चिंताजनक असून, वनविभाग व प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली.

जाहिरात

थोरात यांनी आज जवळेकडलग येथे पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन वडील वसंत पवार तसेच कुटुंबातील सदस्यांची भेट घेत सांत्वन केले. कृष्णाच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर थोरात यांनी समाजमाध्यमातून शोक व्यक्त केला होता. तसेच कार्यकर्ते व संबंधित यंत्रणेला कुटुंबाला आवश्यक मदत करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

जाहिरात

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, “बिबट्यांचे राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात वाढणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. महिला, विद्यार्थी आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेक शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जातात, तर विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्यामुळे वनविभागाने अधिक सतर्कतेने काम करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

जाहिरात

वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही शेततळ्यांच्या परिसरात संरक्षण जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन केले.

जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत थोरात यांनी प्रशासनाला यापूर्वीही सतर्क केले असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ यांनी जवळेकडलग परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची मागणी केली.

यावेळी रामहरी कातोरे, विष्णुपंत रहाटळ, गुलाबराव देशमुख, राजेंद्र कडलग, गिरीश सुर्वे, नानासाहेब वामन, उत्तम सुर्वे, संजय देशमुख, सुरेश कडलग, दत्ता कडलग, गणेश कडलग, सुमित देशमुख, सौरभ कडलग, चेतन देशमुख यांच्यासह गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, पवार कुटुंबीयांचे नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे