आपला जिल्हा

साधना विद्यालय व शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात “हरित रक्षाबंधन” उत्साहात साजरे

साधना विद्यालय व शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात “हरित रक्षाबंधन” उत्साहात साजरे

साधना विद्यालय व शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात “हरित रक्षाबंधन” उत्साहात साजरे
जाहिरात

हडपसर विजय कापसे दि १० ऑगस्ट २०२५राखीच्या पवित्र नात्याला पर्यावरणपूरक वळण देत, साधना विद्यालय व आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात “हरित रक्षाबंधन” उत्साहात साजरा करण्यात आले. परंपरेने बहीण भावाला राखी बांधते, परंतु या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून कापड, कागद, बिया, कापूस, वाक यांच्या वापर करून जवळ जवळ १०० पर्यावरणपूरक  राख्या तयार केल्या व त्या विद्यालयातील वृक्षांना बांधून त्यांच्या सुरक्षिततेची शपथ घेतली.

जाहिरात

आजच्या काळात शहरीकरण, औद्योगिकीकरण व आर्थिक विकासच्या नावाखाली प्रंचड वृक्षतोड होत आहे. परिणामी समृद्ध जैवविविधता असलेली आपली भूमी ओसाड बनत चालली आहे. महावृक्ष तोडून त्यांच्या जागी लहान रोपे लावल्याने पर्यावरणाचे नुकसान भरून येण्यासारखे नाही. निसर्ग स्वतः परिपूर्ण आहे फक्त मानवी हस्तक्षेप रोखणे गरजेचे आहे. असे मत शाधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी व्यक्त केले.

जाहिरात

साधना विद्यालयातील हरित सेना पथकातील विद्यार्थ्यांसाठी हरित रक्षाबंधन या उपक्रमाचे योजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना वृक्ष हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाने वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करणे, त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. हरित रक्षाबंधन पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाचे आहे तसेच आजच्या आधुनिक युगात खूप महत्वाचे आहे, असे मत राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख  अमोल चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

जाहिरात
 या कार्यक्रम प्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य  जाधव डी. जी., उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे उपस्थित होते. तसेच ज्युनिअर विज्ञान विभाग प्रमुख  सावंत डी. बी.,  महामुनी एन. आर., साधना खोत, बोडके आर. व्ही., माने एच, एस., टेंगले के. एम.,  भागवत एन. पी., क्षीरसागर टी. टी.,  लोंढे पी. बी., पिसे एस. ए.,  जुनिअर कॉलेजचे सर्व  शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि हरित सेनेतील  विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे