आपला जिल्हा

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ जुन २०२५छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आज कोपरगाव मंडळाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात १३६ महसूल दाखल्यांचे तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना महसूल विषयक विविध दाखले व लाभ प्रदान करण्यात आले.

जाहिरात
शिबिरास शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.  शिबिरात उत्पन्न दाखले – ४०, जातीचे दाखले – २२,  जिवंत ७/१२ मोहिमेंतर्गत वारस फेरफार – ८, रेशनकार्ड वाटप – २१,  ७/१२ व ८ अ उतारे – ४५, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी – १८ अशा एकूण १३६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

जाहिरात
यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मंडळाधिकारी मच्छिंद्र पोकळे, ग्राम महसूल अधिकारी जगदीश शिरसाठ (कोपरगाव), अश्विनी निर्मळ (येसगाव), वैशाली दुकळे (मुर्शतपूर), वाल्मिक पवार (शिंगणापूर) तसेच महसूल सेवक व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात गौतम
या शिबिराला कोपरगाव मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महसूल सेवा थेट शिबिरात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे