सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे मागील दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद होती–सचिन दिघे

सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे मागील दीड वर्षापासून तळेगाव पाणीपुरवठा योजना बंद होती–सचिन दिघे
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे नवीन लोकप्रतिनिधीने श्रेय घेऊ नये
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून योजना सुरू; नवीन लोकप्रतिनिधीचे वराती मागून घोडे
योजना माहित नाही तरीही श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न –अविनाश सोनवणे

Sangmner vijay kapse दि २० मे २०२६–तळेगाव 16 गावे पाणीपुरवठा योजना ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. तालुक्याच्या अगदी टोकावर या योजनेमुळे पिण्याचे पाणी मिळाले मात्र मागील दीड वर्षापासून नवीन सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात ही योजना पूर्णपणे बंद होती जनतेचे पाण्यासाठी हाल होत होते अशावेळी नागरिकांच्या मागणीवरून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विशेष प्रयत्न केल्याने ही योजना चालू झाली असल्याचे सचिन दिघे यांनी म्हटले असून नवीन लोकप्रतिनिधीला अजून योजना सुद्धा माहिती नाही तरी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी केली आहे.

तळेगाव दिघे येथील चौफुलीवर या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवीन लोकप्रतिनिधी ज्यांना या योजनेची माहिती नाही त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये असे आव्हान केले आहे .यावेळी बोलताना माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रभाकर कांदळकर म्हणाले की, तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. तालुक्याच्या टोकावर असलेल्या देवकवठे गावापर्यंत या योजनेचे पाणी वेळेत पोहोचत होते. ज्या ज्या वेळेस अडचण आली त्या त्यावेळेस थोरात सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा तातडीने दाखल होऊन पाणीपुरवठा सुरळीत करायची. अनेक वेळा वीजबिल थकले.त्यावेळेस लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विविध निधीच्या माध्यमातून वीज बिल भरून ही योजना सुरू ठेवली. मात्र मागील दीड वर्षापासून ही योजना बंद आहे इतक्या दिवस यांना हे का सुचले नाही असा सवाल त्यांनी विचारला.

तर सचिन दिघे म्हणाले की महायुतीचे कार्यकर्ते व पालकमंत्र्यांचे समर्थक असलेले कोल्हेवाडी मधील अनेक लोकांनी योजनेची जाणीवपूर्वक अडवणूक केली. याबाबत तळेगाव भागातील सर्व कार्यकर्त्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर स्वतः माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबंधित शेतकऱ्यांना फोन करून त्यांची मनधरणी केली यावेळी त्यांनी संमती दिली. या कामांमध्ये नवीन लोकप्रतिनिधी कुठेही नव्हते.

तर सभापती अविनाश सोनवणे म्हणाले की, नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे त्यांना अजून योजना सुद्धा माहिती नाही ते पहिल्यांदा या योजनेचे काम पाहण्यासाठी आले आहे. त्यांचे कार्यकर्ते पाठपुराव्यासाठी व या योजनेच्या कामांमध्ये योगदानासाठी होते का हा प्रश्न विचारताना जनतेला सर्व माहीत असल्याचे ते म्हणाले.

तर सरपंच जनार्दन कासार म्हणाले की काकडवाडीला दीड वर्षापासून पिण्याचे पाणी नाही. योजना बंद आहे. जे समर्थ त्याठिकाणी होते ते एकदा तरी पाण्याच्या मागणीसाठी आले का हा सवाल त्यांनी विचारला.
तर सुनील उकिरडे म्हणाले की सध्याचे सध्याचे सत्ताधारी यांचे या योजनेमध्ये कोणतेही योगदान नाही फक्त फोटोसाठी येणारी ही मंडळी आहे.
तर माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, संबंधित कामाचा ठेकेदार हा सोलापूर जिल्ह्यातील होता या ठेकेदाराला कोणी त्रास दिला आणि कशासाठी दिला हे सर्वांना माहिती आहे. हप्तेखोरी आणि टक्केवारीमुळे मागील दीड वर्षापासून तालुक्याची मोठी बदनामी होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तळेगाव भागातील हौशीराम सोनवणे ,तीगावचे सरपंच डि.के सानप,योगेश सोनवणे, वरझडीचे डॉ संदीप गोरडे ,सचिन गोरडे, प्रकाश गोरडे ,संजय दिघे ,पांडुरंग सुपेकर, किशोर सुपेकर ,रामदास भागवत ,बाळासाहेब दिघे, संजय दिघे, रावसाहेब जंबुकर, सखाराम थोरात, नानासाहेब कुळधरण, विलास थोरात, सरपंच विलास सोनवणे, विलास मास्तर सोनवणे, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, राजेंद्र मुंगसे, विजय गोडगे ,प्रताप गोडगे, अजित शेवकर, यांच्यासह 16 गावांमधील सुमारे दीडशे ते 200 कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील दीड वर्ष सत्ताधारी झोपले होते का
तळेगाव भागाची जीवन वाहिनी असलेल्या या योजनेचे पाणी मागील दीड वर्षापासून गावांमध्ये येत नाही त्यामुळे महिला नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. सातत्याने पाण्याची मागणी होत असताना सध्याचे सत्ताधारी झोपले होते का असा सवाल करताना हे काम लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे त्यामुळे कोणीही याचे श्रेय घेऊ नये असे स्पष्ट मत अनिल कांदळकर व योगेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.



