आमदार आशुतोष काळे

गौतम बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश – आ.आशुतोष काळे

गौतम बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश – आ.आशुतोष काळे

गौतम बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश – आ.आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १७ ऑगस्ट २०२४ – एखादी सहकारी संस्था स्थापन झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम परिसराच्या विकासावर होवून तो परिसर विकास कसा समृद्ध होतो हे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक संलग्न सहकारी संस्थांच्या केलेल्या स्थापनेतून दिसून येते. यामध्ये गौतम सहकारी बँक अग्रभागी असून संकटातून प्रगतीची शिखरे कशी गाठता येवू शकतात हे बँकेने मागील दहा वर्षात दाखवून दिले आहे.त्यामुळे तोट्यात गेलेली गौतम बँक आज संपूर्ण तोटामुक्त झाली असल्याचे सांगत सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा आ. आशुतोष काळे यांनी गौतम सहकारी बँकेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

जाहिरात

          सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करणा-या गौतम सहकारी बँकेची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.१७) रोजी बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे होते.   

जाहिरात

             यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,गौतम सहकारी बँकेने सातत्याने अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करतांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काम केले. रिझर्व्ह बँकेने आर्थिक तपासणी करून बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून बँकेवर मागील एकोणीस वर्षापासून असलेले सर्व निर्बंध मागे घेतले आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजाच्या कक्षा निश्चितपणे रुंदावल्या असून राष्ट्रीयकृत बँकेच्या धर्तीवर बँकेच्या ग्राहकांना युपीआय द्वारे फोन पे, गुगल पे, पेटीएम आदी सुविधा उपलब्ध होणार असून ग्राहकांना अत्यंत कमी वेळा बँकेत येण्याची गरज भासणार आहे. बँकेने मोबाईल बँकिंग मार्फत RTGS/NEFT व बीबीपीएस सेवा सुरु केली असून लवकरच एटीएम डेबिट कार्ड, एपीबीएस, एनएसीएच या सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाण्याची देखील गरज भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

            सभासदांच्या व ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशाचे संरक्षण करणे, त्यांचे हित जपणे हि कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शिकवण डोळ्यासमोर ठेवून काम करतांना त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याविचारातून  संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक व्यवस्थापन अतिशय काटकसरीने काम करीत आहे. बँकेकडे ११५ कोटीच्या ठेवी व कर्ज येणे ७१ कोटी ८८ लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा ३ कोटी ३८ लक्ष ६७ हजार झालेला आहे. त्यातून सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून निव्वळ नफा १ कोटी १६ लाख ८७ हजार झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच एनपीए शून्य टक्के असून चालू आर्थिक वर्षात देखील बँक व्यवस्थापनाने वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन केले. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे माध्यमातून आतापर्यंत जवळपास ६० कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले असून नियमित हफ्ता वसुलीमुळे हे कर्ज मार्च २०२४ अखेर रू.३५ कोटी येणे असल्याचे सांगत ह्या कर्ज वाटपात सहकारी बँकांमध्ये गौतम बँक राज्यात अव्वल स्थानी असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.

गौतम सहकारी बँकेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे समवेत मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे आदी मान्यवर.

            प्रास्तविक करतांना प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल उपस्थित सभासदांसमोर मांडला. अडचणीवर मात करून रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने नवीन दोन शाखा येवला शहर व खेडले झुंगे याठिकाणी नुकत्याच सुरू झालेल्या आहेत. तसेच बँकेच्या नगर व नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ शाखा व्यवस्थितपणे सुरु असून मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार मिळाले आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आथिर्क दृष्ट्या सक्षम बँकेचे सर्व निकष बँकेने पाळले आहेत असे सांगितले.

              सभेच्या अध्यक्षपदाची सुचना बापूराव वक्ते यांनी मांडली त्यास दिलीपराव चांदगुडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी आर्थिक वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव संचालक व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तीरसे यांनी मांडला.

यावेळी संचालक मंडळाच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी विषय पत्रिकेवरील १६ विषय मांडले त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, सुधाकर रोहोम, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले,प्रवीण शिंदे,गंगाधर औताडे, श्रावण आसने,  गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीचे मा.सभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बँकेचे व्हा सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण संतोष पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट चे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी सामान्य प्रशासन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार संचालक सी.ए. दत्तात्रय खेमनर यांनी मानले.सभेचे कामकाज संपल्यानंतर सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या मार्फत प्रशिक्षण आयोजित केले होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे