आपला जिल्हा

येवल्यातील आत्मा मालिक गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी संपन्न

येवल्यातील आत्मा मालिक गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी संपन्न

येवल्यातील आत्मा मालिक गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी संपन्न

जाहिरात

येवला प्रतिनिधी दि २ जुलै २०२४–  सनातन भारतीय संस्कृती या संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची दंत तपासणी करत त्यांना दातांची काळजी कशी घेयाची या विषयी मार्गदर्शन केले.

जाहिरात

सनातन भारतीय संस्कृती या संस्थेतर्फे प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ. गीतांजली अट्टल यांनी आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल मधील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत दंतचिकित्सा करत मुलांनी आपल्या  दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मुलांनी दातांची काळजी घेण्यासाठी रोज दोन वेळेस ब्रश केला पाहिजे. ब्रश करतांनी वाटाण्या एवढीच टूथपेस्ट ब्रशवर घ्यावी व फक्त दोन मिनिटे ब्रश करावा, अधून मधून मिठाच्या  कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. चॉकलेट कॅडबरी असे  गोड पदार्थ खाणे टाळावे.लहान मुलांनी चहा घेऊ नये.त्यामुळे दातांतील कॅविटीजचे प्रमाण वाढते असे सांगत आपले दात चांगले असले तर आरोग्य ही चांगले राहते.असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

जाहिरात

या उपक्रमाचा शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तसेच सनातन भारतीय संस्कृती ही संस्था नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असते. त्याबद्दल गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, प्राचार्य तुषार कापसे आदी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालकांनी  संस्थेचे आभार व्यक्त करत त्यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे