अहमदनगर जिल्हा बँकस असोसिएशनचा येत्या रविवारी शिर्डीत भव्य पुरस्कार सोहळा — सत्येन मुंदडा
अहमदनगर जिल्हा बँकस असोसिएशनचा येत्या रविवारी शिर्डीत भव्य पुरस्कार सोहळा — सत्येन मुंदडा
अहमदनगर जिल्हा बँकस असोसिएशनचा येत्या रविवारी शिर्डीत भव्य पुरस्कार सोहळा — सत्येन मुंदडा
कोपरगाव विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४–अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँकांनी केलेल्या कार्याची दखल व त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन म्हणून अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन दरवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या नागरी सहकारी बँकांचा गौरव, पुरस्कार देऊन करत असते यावर्षी पुरस्कार सोहळा येत्या रविवारी 29 सप्टेंबर रोजी साई तीर्थ थीम पार्क , शिर्डी येथे आयोजित केलेले आहे
पुरस्कार वितरण सोहळा मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी असोसिएशनचे चेअरमन सत्यम मुंदडा व्हाईस चेअरमन शिवाजी व्यवहारे तसेच असोसिएशनचे माजी चेअरमन गिरीशजी घैसास यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे
या पुरस्कारासाठी दोन प्रकारची वर्गवारी केलेली आहे व्यवसाय वाढ व योग्य एनपीएचे व्यवस्थापन करणाऱ्या बँकांना ‘ ‘ बिंग्स अवॉर्डने ‘सन्मानित करण्यात येणार आहे . व विविध बँकिंग प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या बँकांना ‘ बिट्स अवॉर्ड ‘ ने सन्मानित करण्यात येणार आहे . या पुरस्कार सोहळ्यास अहमदनगर जिल्हा व परिसरातील 36 बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे नागरी सहकारी बँकांमध्ये या सोहळ्या बाबत विशेष उत्सुकता असते