कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे व विज वाहिन्या स्थलांतर करण्यासाठी पाऊन कोटी-आ. आशुतोष काळे
कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे व विज वाहिन्या स्थलांतर करण्यासाठी पाऊन कोटी-आ. आशुतोष काळे
कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे व विज वाहिन्या स्थलांतर करण्यासाठी पाऊन कोटी-आ. आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि ३ ऑक्टोबर २०२४ :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच वीज वाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यासाठी जवळपास पाऊन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघातील विकास कामांबरोबरच विजेच्या बाबतीत असलेल्या समस्या आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्या आहेत.गावागावांतील नागरिक व शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक गावांतील ओव्हर लोड ट्रान्सफॉर्मरची समस्या दूर करून कमी दाबाने होणारा वीजपुरवठा त्यामुळे वारंवार ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणे या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी जवळपास पावणे दोन कोटी निधी देवून या समस्या दूर केल्या आहेत त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या बहुतांश प्रमाणात विजेच्या समस्या दूर झाल्या आहेत. तरी देखील ज्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आवश्यकता आहे व ज्या वीज वाहिन्या स्थलांतरीत करायच्या होत्या त्यासाठी निधी मिळावा याबाबत आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला या कामासाठी ७६.३२ लक्ष निधी देण्यात येणार आहे.
या निधीतून मतदार संघातील कारवाडी येथील ताम्हाणे डी.पी.येथे नवीन ६३ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, दहेगाव बोलका येथील पाणी पुरवठा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करणे, ब्राम्हणगाव येथील वाकचौरे डी.पी येथे नवीन ६३ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, शिंगवे येथील जोशी वस्ती या ठिकाणी नवीन १०० के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, कोपरगाव बेट भागातील संत जनार्दन स्वामी मंदिर प्रवेशद्वाराजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणे, रवंदे येथील रामदास लामखडे यांच्या वस्तीवरील ११ के.व्ही.वीज वाहिनी स्थलांतरीत करणे,अंजनापूर येथील माऊली डी.पी. येथे नवीन ६३ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे,तीनचारी (कोकमठाण) येथील ११ के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी.लाईन स्थलांतरीत करणे, पोहेगाव बु.येथील पिंपळादेवी ते वत्सल मॉडेल स्कूल पर्यंत स्ट्रीट लाईटचे १५ पोल टाकणे, रांजणगाव देशमुख खालकर मळा येथील डि.टी.सी. लाईन स्थलांतरीत करणे, दहेगाव बोलका समाज मंदिर येथील लाईन स्थलांतरीत करणे, धामोरी येथील नारायण मांजरे घराजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणे, धोत्रे वीरभद्र विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे, भोजडे गावातील सौ.सुशीलामाई काळे विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे आदी कामांचा समावेश आहे. नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून हे काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. विजेच्या समस्या दूर करण्यासाठी पाऊन कोटी निधी दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले आहे.