भगवान विश्वकर्मानी विश्वाची निर्मिती केली- शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे
भगवान विश्वकर्मानी विश्वाची निर्मिती केली- शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे

कोपरगाव विजय कापसे दि ११ फेब्रुवारी २०२५- ब्रह्मदेवाने विश्वकर्मांकडून विश्वाची निर्मिती करून घेतली. भगवान विश्वकर्मा हे उत्तम नियोजक होते. भगवान कृष्णाची राजधानी द्वारका, महाभारतातील कौरवांची राजधानी हस्तिनापुर शहर, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, तसेच देवांच्या शस्त्रांची देखील निर्मिती विश्वकर्मांनी केली. देशातील सर्वच कारागीर विश्वकर्मांचेच अवतार आहेत. बारा बलुतेदार समाजातील कारागिरांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेतून कारागिरांना एक लाखाच्या वरती आर्थिक सहाय्य केले जाते.अवघ्या विश्वाची निर्मिती भगवान विश्वकर्मांनी केली. त्याचप्रमाणे दर्जेदार उत्पादनवाढीसाठी विविध प्रकारच्या कारागिरांना सरकार प्रोत्साहन देत आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी पोहेगाव येथे विश्वकर्मा जयंती सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.








