तहसील कार्यालयात सोमवारी आ. आशुतोष काळेंचा जनता दरबार
तहसील कार्यालयात सोमवारी आ. आशुतोष काळेंचा जनता दरबार
तहसील कार्यालयात सोमवारी आ. आशुतोष काळेंचा जनता दरबार

Kopargaon vijay kapse दि ६ जून २०२६—कोपरगाव मतदार संघातील नागरीकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी जनता दरबाराच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्या आहेत. हि जनता दरबाराची परंपरा अविरतपणे सुरु ठेवून पंचायत समितीच्या सर्व विभागात नागरीकांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सोमवार (दि.०८) रोजी दुपारी ०३:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे जनता दरबार घेणार आहेत. अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांचे अनेक शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामे असतात. त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने ये-जा असते. सर्व शासकीय कार्यालयात मतदार संघातील नागरिकांची असलेली कामे विना अडथळा लवकरात लवकर व्हावीत.यासाठी नागरीकांना येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून या अडीअडचणी विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत एकाचवेळी चर्चा घडवून ते प्रश्न तातडीने सुटावे यासाठी आ.आशुतोष काळे जनता दरबार घेत आहेत.
ज्या नागरीकांच्या पंचायत समितीच्या बाबतीत अडचणी आहेत अशा नागरिकांनी सोमवार (दि.०८) रोजी दुपारी ०३:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात उपस्थित राहून आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या. जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न सुटले जातील. त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.





