शहर पोलिस कोपरगाव

सतराशे किलोचा गोमांस शहर पोलिसांनी जप्त करत आरोपीना केले जेरबंद

सतराशे किलोचा गोमांस शहर पोलिसांनी जप्त करत आरोपीना केले जेरबंद
सतराशे किलोचा गोमांस शहर पोलिसांनी जप्त करत आरोपीना केले जेरबंद
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ एप्रिल २०२४गोमांस बाळगणे अथवा विक्री करणे कायद्याने गंभीर गुन्हा असताना देखील दररोज मोठ्या प्रमाणात गोमांस पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतात नुकतेच कोपरगाव शहर पोलिसांनी देखील शहर पोलीस स्टेशन हद्दीत २ लाख ७० हजार रुपये किमतीचा १७०० किलो गोमांस जप्त करत मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ शनिवारी २७ एप्रिल रोजी रात्री मोहम्मद शरीफ कुरेशी राहणार दादामिया उस्मान यांची चाळ कुर्ला मुंबई, रिजवान मलंग कुरेशी राहणार हाजी करमत अली रोड उस्मान गल्ली आजी मिया चाळ कुर्ला मुंबई हे टाटा कंपनीचा इट्रा व्ही एम एच ४३ बी एक्स ८७८५ या टेम्पोमध्ये १५० रुपये किलो प्रमाणे २ लाख ७० हजार रुपये किमतीचे १७०० किलो वजनाचे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस भरून ते विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना कोपरगाव शहर पोलिसांना मिळून आला असता. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांच्या फिर्यादीनुसार मोहम्मद कुरेशी व रिजवान कुरेशी यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये २१३/२०२३  महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९७६ चे कलम ५,९,११ भांदवि कलम १८८,२७९,२७१,३४ साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांचे मांस व ६ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल के ऐ जाधव हे करत आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे