विखे-पाटील

निळवंडे धरण वितरिकांच्या कामांसाठी ८०० कोटी मंजूर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निळवंडे धरण वितरिकांच्या कामांसाठी ८०० कोटी मंजूर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निळवंडे प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३ च्या बंद नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि ९ ऑक्टोबर २०२४ – निळवंडे धरणाच्या अंतर्गत वितरिकांच्या कामांसाठी नाबार्डच्या माध्यमातून ८०० कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

जाहिरात

निळवंडे प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३ च्या बंद नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन श्री‌.विखे पाटील यांच्या हस्ते वडझरी खुर्द येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, उर्ध्व प्रवरा धरण (निळवंडे) प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कैलास ठाकरे, कोऱ्हाळेचे सरपंच पूजा झिंजुर्डे आदी यावेळी उपस्थित होते.

जाहिरात

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, निळवंडे कालव्यांच्या या वितरिकेमुळे कोपरगाव तालुक्यातील १० , राहाता मधील ६ व संगमनेर मधील १ अशा १७ गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या विविध योजना व अनुदानामुळे शेतकऱ्यांना बॅंक खात्यात मदत आली आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी निळवंडे व जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

निळवंडे कालव्यांच्या या वितरिकेमुळे परिसरातील १७ गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे प्रदीप हापसे यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी वाळकी, कोऱ्हाळे व डोऱ्हाळे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे