आपला जिल्हाआमदार आशुतोष काळे

सप्तशृंगी महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद- आ आशुतोष काळे

सप्तशृंगी महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद- आ आशुतोष काळे

सप्तशृंगी महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद- आ आशुतोष काळे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४- सप्तशृंगी महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील शारदानगर येथील सप्तशृंगी महिला मंडळ व डॉ घायतडकर  पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्रीच्या पूर्व काळात आयोजित शारदीय नवरात्रोत्सव कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात
नवरात्रीच्या पर्वकाळात डॉ घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक व सप्तशृंगी महिला मंडळाच्या संस्थापक डॉ भाग्यश्री कुणाल घायतडकर, अध्यक्ष वैजयंती कुटे, उपाध्यक्ष सारिका भडांगे, सचिव जयश्री जाधव आदी सर्व सदस्यांच्या संकल्पनेतुन शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महिला मुलींसाठी पैठणीचा खेळ, नाच ग घुमा, फॅन्सी ड्रेस, दांडीया स्पर्धा आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळातील सारिका भडांगे,जयश्री जाधव, नंदिनी पाटील, सोनम गोर्डे, बेबीताई कुटे, सुरेखा नरोडे, नंदिनी लांडगे आदि यशस्वी स्पर्धक महिला मुलींचा आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव येथील साई ज्योती हॉस्पिटलचे डॉ.तुषार गलांडे, डॉ घायतडकर पाटील डेंटल  क्लिनिकचे सर्वेसर्वा तसेच सप्तशृंगी महिला मंडळाचे मार्गदर्शक डॉ. कुणाल घायतडकर आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे व सहभागी मुली महिलांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा देत सप्तशृंगी महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे