आपला जिल्हा

अहिल्यानगर जिल्ह्यात १९ व २० तारखेला वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता

अहिल्यानगर जिल्ह्यात १९ व २० तारखेला वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता

अहिल्यानगर जिल्ह्यात १९ व २० तारखेला वादळीवारयासह अतिवृष्टीची शक्यता

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ ऑक्टोबर २०२४भारतीय हवामान खात्‍याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्‍यानगर जिल्‍ह्यात दि. १९ आणि २० ऑक्टोबर रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्‍टीची शक्‍यता वर्तविण्‍यात आलेली असून अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासाठी ”ऑरेंज अलर्ट” जारी करण्‍यात आलेला आहे तसेच दि. २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आलेली असून अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासाठी ”येलो अलर्ट” जारी करण्‍यात आलेला आहे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे.

जाहिरात

पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे