श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात पत्रकार दिन उत्साहाने संपन्न

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात पत्रकार दिन उत्साहाने संपन्न
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात पत्रकार दिन उत्साहाने संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ६ जानेवारी २०२५– श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दिन विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे संस्थापक गोकुळचंदजी ठोळे व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे हे होते. दै.पुण्यनगरी वृत्तपत्राचे पत्रकार राजेंद्र सालकर यांनी त्यांच्या मनोगतातून नवीन पत्रकारांनी बातमीची शहानिशा करून सत्य बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला या प्रसंगी दिला.कॉपी पेस्ट पत्रकार होणे टाळावे व आपली स्वतः ची ओळख निर्माण करावी असे त्यांनी सुचवले.संस्थेचे सदस्य डॉ. अमोल अजमेरे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांची भूमिका स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या आधुनिक जगापर्यंत अत्यंत महत्त्वाची असल्याची प्रतिपादन केले. वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा असतात,शाळेचे वेगवेगळे उपक्रम समाजा पर्यत पोहचवण्याचे महत्वाचे काम तेआपल्या माध्यमातुन पुर्ण करतात त्या बद्दल पत्रकारांचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब जवरे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेचे महत्त्व व आव्हाने विषद केले. तसेच पत्रकारांनी निरपेक्ष व तटस्थ भावनेने पत्रकारीता करावी. असे सुचवले. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार मनोज जोशी,महेश जोशी, सचिन धर्मापुरीकर, युसुफ रंगरेज,संजय देशपांडे,सोमनाथ सोनपसारे, विजय कापसे,मनिष जाधव,बिपिन गायकवाड,सुनिल ससाणे,योगेश डोखे,हाफीज शेख,अनिल दीक्षित,हेमचंद्र भवर,संतोष जाधव,मनिष जाधव, प्रमोद पवार,रवि जगताप,विनोद जवरे,अमोल गायकवाड,आदी मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील सर्व नामांकित पत्रकार बंधू-भगिनींचा सत्कार सोहळा विद्यालयांच्या वतीनेआयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक दिगंबर देसाई यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य आनंद ठोळे, डॉ. अमोलजी अजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे , माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, ज्येष्ठ माजी शिक्षक दिलीप तुपसैंदर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगिता मालकर यांनी सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून पत्रकारना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बलभीम उल्हारे यांनी केले.



