आपला जिल्हा

ब्राम्हणगाव मध्ये बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न

ब्राम्हणगाव मध्ये बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न
ब्राम्हणगाव मध्ये बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२५मुलाच्या जीवनाच्या सर्वांगीण  विकासासाठी  ० ने ५ वर्षाचा कालावधी अंत्यत महत्वाचा समजला जात असतो. या काळात बालकाच्या मेंदूचा  ८५% विकास होत असतो.हे लक्षात घेऊन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकासाच्या दृष्टीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोपरगाव मधील येसगाव बीटच्या वतीने शुक्रवार दि २४ जानेवारी रोजी कोपरगाव तालुका बालविकास अधिकारी रुपाली धुमाळ, ब्राम्हणगावचे सरपंच अनुराग येवले, येसगाव गट पर्यवेक्षिका देवगुणे मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने ,माजी सरपंच बाळासाहेब आहेर ,माजी उपसरपंच शोभाताई बनकर, सदस्य रावसाहेब शिंगाडे, नाना जाधव, देविदास आसने, बाबासाहेब जगताप, नाना सोनवणे  आदीं  प्रमुख मान्यवरांच्या  उपस्थितीत आरंभ  बालक पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात आत्मा
या मेळाव्यामध्ये खेळ कृती प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी लहान मुलांना विविध खेळांची माहिती करून देत, त्यांना खेळ खेळण्यास प्रोत्साहन देण्यात आले. भविष्याचे झाड मुखवटे विविध प्रकारच्या संवेदनशील पालकत्व स्पर्श दृष्टीनेलावलेले स्ट्रॉल आकर्षण बनले होते.

जाहिरात
तर या प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ यांनी बोलतांना सांगितले की, आपले बाळ घरामध्ये ठेवलेल्या साहित्यांसोबत जेव्हा खेळ खेळत तेव्हा तिथल्या नवीन साहित्याची त्याला ओळख होते. तसेच खेळताना बालक विविध भूमिका निभावते त्यामुळे बालकाचा भावनिक आणि बौद्धिक विकास होतो. घरातील खेळण्याद्वारे बालक जीवनामध्ये आवश्यक असलेले सर्व जीवन कौशल्य शिकू शकते. याची बालकाला पुढील आयुष्य जगताना मदत होते. समवयस्क बालकांबरोबर खेळल्यामुळे बालकाचा सामाजिक विशेषतः भावनिक विकास उत्तम रीतीने घडून येण्यासाठी पालकांनी घरी आणि अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीमध्ये बालकांना खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे असे धुमाळ यांनी सांगितले.

जाहिरात
या प्रसंगी उपस्थित असलेले गावचे सरपंच अनुराग येवले यांनी सर्व अंगणवाडी सेविकानी अतिशय उत्कृष्ट पणे या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.या प्रसंगी येसगाव गटातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, ० ते ५ वयोगटाचे मुले ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे