के जे सोमय्या कॉलेज

सोमैय्या महाविद्यालयाचे डॉ.दिपक बुधवंत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त 

सोमैय्या महाविद्यालयाचे डॉ.दिपक बुधवंत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त

सोमैय्या महाविद्यालयाचे डॉ.दिपक बुधवंत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ ऑक्टोबर २०२४कोपरगाव येथील प्रसिद्ध कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दिपक सुखदेव बुधवंत यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी दिली आहे.

जाहिरात

डॉ. दीपक बुधवंत यांनी “शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान वर्तन- संदर्भ २००९- २०१९” या विषयावर आपले शोधकार्य पूर्ण केले. यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ. जे. पी. बिडलान यांचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त प्रो. विलास आवारी,  डॉ. एस. एम. देवरे यांचेही मार्गदर्शन मिळाले. 

जाहिरात

त्यांनी मिळविलेल्या या शैक्षणिक यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे, सचिव  ॲड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त  संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो . विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर.सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी प्राप्त केलेल्या या पदवी बद्दल पंचक्रोशीतुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिपक बुधवंत

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे