विखे-पाटील

कोणी कितीही अडथळे आणू द्या, महायुती सरकारच्‍या  योजना कोणीही रोखू शकणार नाही- पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण  विखे पाटील 

कोणी कितीही अडथळे आणू द्या, महायुती सरकारच्‍या  योजना कोणीही रोखू शकणार नाही- पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण  विखे पाटील 

कोणी कितीही अडथळे आणू द्या, महायुती सरकारच्‍या  योजना कोणीही रोखू शकणार नाही- पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण  विखे पाटील 

जाहिरात

आश्‍वी विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४– शेतक-यांना शुन्‍य रकमेचे वीजबिल देण्‍याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. मात्र संगमनेर तालुक्‍यात जाणीवपूर्वक शेतक-यांना वीज बिल मिळू दिले नाही. कॉंग्रेस नेत्‍यांची आधिका-यांवरही किती दशहत आहे हे यातून उघड झाले.  कोणी कितीही अडथळे आणू द्या, महायुती सरकारच्‍या  योजना कोणीही रोखू शकणार नाही असा स्‍पष्‍ट इशारा महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण  विखे पाटील यांनी दिला.

जाहिरात

       महायुतीच्‍या प्रचारार्थ मंत्री विखे पाटील यांनी चणेगाव, दाढ, झरेकाठी या गावांमध्‍ये मतदारांच्‍या भेटी घेतल्‍या, त्‍यांच्‍या समस्‍याही जाणून घेतल्‍या. महायुती सरकारच्‍या योजनांचा लाभ मिळतो याची माहीतीही जाणून घेतली. मात्र अनेक शेतक-यांनी शुन्‍य रकमेचे वीज बिल मिळाले नसल्‍याचे तक्रार मंत्री विखे पाटील यांच्‍याकडे केली. मंत्री विखे पाटील यांनी माहीती घेतल्‍यानंतर संगमनेर तालुक्यात शुन्‍य रकमेचे आलेले वीज बिल शेतक-यांना जाणीवपूर्वक मिळू न देण्‍यासाठी प्रयत्‍न झाले असल्‍याचेही निदर्शनास आले.

जाहिरात

त्‍यानंतर आधिका-यांशी संपर्क साधून ही वीज बिल तातडीने देण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली. शुन्‍य रकमेचे बिल देण्‍याचा निर्णय हा महायुती सरकारने आचारसंहितेपुर्वीच घेतलेला आहे. आधिका-यांना फक्‍त त्‍याची अंमलबजावणी करायची होती. याला आचार संहितेचा कोणताही अडथळा नव्‍हता. पण केवळ दडपशाहीला आधिकारीही बळी पडले.

       मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महायुती सरकार हे जनतेच्‍या मनातील सरकार आहे. शेतक-यांच्‍या प्रश्‍नांबाबत अतिशय संवेदनशिल राहून, सरकारने निर्णय केले आहेत. शेतक-यांसाठी सुरु केलेल्‍या योजनांचा लाभ त्‍यांना मिळावा म्‍हणून, म्‍हणून सरकारचे प्रयत्‍न आहेत. परंतू या प्रयत्‍नांमध्‍ये कोणी अडथळा आणत असेल तर, जनता त्‍यांना धडा शिकवेल असा इशारा देवून या तालुक्‍यात कोणत्‍या कोणत्‍या मार्गाने दडपशाही चालते हे आता लोकांना कळले आहे. योजनांची अंमलबजावणी करताना जर आधिका-यांवरही अशा पध्‍दतीची दडपशाही असेल तर, योजनांचा लाभ मिळू न देण्‍यात कॉंग्रेस नेत्‍याचा किती हस्‍तक्षेप आहे हे आता तुम्‍ही पाहा असे आवाहनही त्‍यांनी उपस्थितांना केले.

       एक रुपयात पीक विमा योजना सुरु झाल्‍याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला. नैसर्गिक संकटात या योजनेची मोठी मदत शेतक-यांना झाली. कापूस, सोयाबीन उत्‍पादकांना अनुदानाची मदतही मोठ्या प्रमाणात झाली. या भागामध्‍ये दूध व्‍यवसाय हा मोठ्या प्रमाणात आहे. दूग्‍ध  व्‍यवसायाला संरक्षण देण्‍यासाठी महायुती सरकारने पुढाकार घेतला. सात रुपयांचे अनुदान देवून या व्‍यवसायाला स्‍थैर्य देण्‍याची भूमिका मंत्री म्‍हणून मला घेता आली. पण हे अनुदान शेतक-यांना मिळू नये म्‍हणून सुध्‍दा काहींनी अडथळे निर्माण केले पण आता शेतक-यांच्‍या खात्‍यात हे अनुदान वर्ग झाले असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

       शिर्डी विधानसभा मतदार संघात या गावांचा समावेश झाल्‍यानंतर विकासाची प्रक्रीया वेगाने सुरु झाली. अनेक गैरसमज संगमनेरच्‍या नेत्‍यांनी पसरविले होते. परंतू आपण त्‍यांना विकास कामे करुन, उत्‍तर दिले. आज या गावांचा चेहरा मोहरा बदलत आहे. विकास कामांमध्‍ये केवळ अडथळे आणण्‍याचे काम त्‍यांच्‍या कार्यालयातून सुरु असले तरी, भविष्‍यात जनता आता हा होणारा हस्‍तक्षेप सहन करणार नाही.

       या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने जनताच त्‍यांच्‍या धाक दडपशाहीला खेख उत्‍तर देई असा इशारा देवन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, अनेक वर्ष त्‍यांचा नाकर्तेपणा उघडा पडला आहे. वर्षानुवर्षे सर्व सत्‍तास्‍थाने असतानाही कोणतेही विकासकामे ते करु शकले नाहीत. आलेले अपयश आता झाकू शकत नाही. त्‍यामुळेच त्‍यांची चिडचिड वाढली आहे. याचा राग ते कसा व्‍यक्‍त करु शकतात हे धांदरफळच्‍या घटनेवरुन संपूर्ण राज्‍याला कळाले असल्‍याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.  

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे