विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांचे काम एक नंबर त्यामुळे त्यांना मताधिक्य देखील एक नंबरच द्यावे- शहराध्यक्ष सुनील गंगुले
विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांचे काम एक नंबर त्यामुळे त्यांना मताधिक्य देखील एक नंबरच द्यावे- शहराध्यक्ष सुनील गंगुले
विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांचे काम एक नंबर त्यामुळे त्यांना मताधिक्य देखील एक नंबरच द्यावे- शहराध्यक्ष सुनील गंगुले
कोपरगाव विजय कापसे दि १७ नोव्हेंबर २०२४ :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी भरघोस निधी मंजुर करून आणल्यामुळे मतदार संघासह कोपरगाव शहराचा देखील सर्वांगीण विकास झाला आहे. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून शहराचा केलेला विकास देखील उल्लेखनीय आहे. विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांचे काम एक नंबर आहे, त्यांची निशाणी असलेले घड्याळाचे बटन देखील मतदान यंत्रावर एक नंबरला आहे आणि त्यांना मताधिक्य देखील एक नंबर द्यावे असे आवाहन कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील विविध प्रभागात महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाल्या. यावेळी मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकासाचा लेखाजोखा शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कॉर्नर सभेच्या माध्यमातून नागरिकांपुढे मांडला यावेळी बोलत होते. यावेळी प्रत्येक कॉर्नर सभेत महिला भगिनींनी आ.आशुतोष काळे यांचे औक्षण केले. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाचे जे प्रश्न सोडविण्याचे वचन मतदार संघातील जनतेला दिले होते त्या वचनांची पूर्तता करून अनेक वर्षापासून शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविला असून महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला आहे.त्यामुळे कधी आठ, कधी पंधरा तर कधी एकवीस दिवसांनी मिळणारे पाणी सध्या तीन दिवसाआड पूर्ण दाबाने स्वच्छ पाणी मिळत आहे व ते लवकरच दररोज मिळणार आहे. मात्र आ.आशुतोष काळे एवढ्यावरच थांबणारे नाहीत. ज्याप्रमाणे त्यांनी पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण केले त्याच धर्तीवर एक ते चार नंबर साठवण तलावाचे काम देखील पूर्ण करून पाणी प्रश्नाच्या अडचणी पूर्णपणे दूर करणार आहे.मतदार संघासह शहरातील रस्त्यांचा विकास झाला असून नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक शासकीय इमारती शहराच्या वैभवात भर घालीत आहे.
कोपरगाव शहरात केलेल्या विकास कामांमुळे रस्त्यांची अवस्था सुधारल्यामुळे बाजारपेठ फुलल्या असून व्यापारी वर्गाच्या चिंता मिटल्या आहेत. चार व्यापारी संकुले उभी राहणार असून काही व्यापारी संकुलांचे काम अंतिम टप्यात आले आहे. डॉ.अण्णाभाऊ साठे स्मारक ते जब्रेश्वर मंदिर रस्ता, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे स्मारक ते श्री साईबाबा कॉर्नर रस्ता, मार्केट कमिटी रोड, धारणगाव रोड,श्रीराम मंदिर रोड,बँक रोड,गुरुद्वारा रोड,गांधीनगर रोड,मोहीनिराज नगर रोड आदी प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचा विकास या पाच वर्षात झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभिकरण, राजमाता जिजामाता उद्यान विकसित करून कोपरगाव शहरातील नगरपरिषदे समोरील मोकळ्या जागेत व साईबाबा कॉर्नर येथे नवीन उद्यान विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर शहरातील प्रत्येक समाजाच्या समाज मंदिरासाठी निधी देवून प्रत्येक समाजाच्या श्रद्धा त्यांनी जपल्या आहेत. शहरातील हद्दवाढ झालेल्या विविध भागात रस्ते, गटारी बांधण्यासाठी तब्बल १० कोटी रुपयांची निधी दिला आहे. शहरात हायमास्ट दिवे बसविण्यासाठी २ कोटी रुपयांची उपलब्धता केली आहे व मतदार संघात विकास साधला आहे. कोपरगाव शहरात भुमीगत गटार व वेस्ट ट्रीटमेन्ट प्लान्टसाठी महाराष्ट्र शासनाकडून २८० कोटीचा निधी आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणला आहे. ही मोजकीच कामे सांगितली आहे मात्र त्यांच्या कामाची यादी खूप मोठी आहे.
सत्ता नसतांना माय-माउलींसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी आ.आशुतोष काळे यांनी अनेक आंदोलने केली आणि सत्ता मिळताच पाणी प्रश्न सोडवून पण दाखविला त्यामुळे असा नेता होणे नाही.राजकारणात लोकप्रतिनिधी आश्वासन देतात मात्र दिलेल्या त्या आश्वासनांची शंभर टक्के अंमलबजावणी होतेच असे नाही परंतु आ.आशुतोष काळे त्याला अपवाद आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तर केलीच आहे. मात्र जी आश्वासने दिली नाही ती आश्वासने देखील पूर्ण केली आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात कोपरगाव शहरासह मतदार संघाच्या जनतेला एवढा विकास पहायला मिळाला असून त्यांच्या रूपाने कर्तुत्ववान नेता आपल्या कोपरगाव मतदार संघाला लाभला आहे.त्यामुळे २०तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांनी केलेला एक नंबर विकास डोळ्यापुढे ठेवून घड्याळाचे एक नंबरचे बटन दाबून त्यांना मताधिक्य देखील एक नंबर द्यावे असे आवाहन सुनील गंगुले यांनी केले आहे.