आपला जिल्हा

धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; ध्वजारोहण केले दिव्यांग बांधवांच्या शुभहस्ते

धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; ध्वजारोहण केले दिव्यांग बांधवांच्या शुभहस्ते

धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; ध्वजारोहण केले दिव्यांग बांधवांच्या शुभहस्ते

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील धोत्रे  गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप विठ्ठलराव चव्हाण व ग्रामपंचायत अधिकारी  अविनाश सीताराम पगारे यांच्या संकल्पनेतून धोत्रे आदर्श गावाकडे वाटचाल करत असून गावात विविध नवनवीन उपक्रम नेहमीच होत असतात त्या पैकीच काल भारताचा ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य सरपंच गावचे सरपंच आदर्श ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एक विचाराने धोत्रे गावातील वंचित घटकातील  प्रकाश मुरलीधर वैद्य या दिव्यांग बांधवांच्या हस्ते धोत्रे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करत एक आदर्श निर्माण केला आहे.

जाहिरात

या उपक्रमाचे धोत्रे पंचक्रोशीमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी प्रकाश वैद्य यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण आहे आज मला माझ्या शारीरिक दिव्यांगाची आठवण देखील झाली नाही इतका मोठा मान मला दिल्याबद्दल त्यांनी सरपंच, ग्रामसेवक उपसरपंच तसेच संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

जाहिरात

या प्रसंगी सरपंच प्रदीप चव्हाण म्हणाले की, प्रकाश वैद्य यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आम्हाला पाहायला मिळाला तोच खरा आमचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला तसेच संविधानात म्हटल्याप्रमाणे सर्वांना समानतेची वागणूक मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा उपक्रम राबवला असून या पुढे देखील आपल्या सर्वांच्या सहकार्याने असे उपक्रम राबविले जाणार आसल्याचे सांगत सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

या प्रसंगी सरपंच प्रदिप चव्हाण, उपसरपंच आरती राजेंद्र जामदार, ग्रामपंचायत सदस्य विजय जयराम जामदार, भगवान चव्हाण, कैलास नारायण चव्हाण, भाऊसाहेब गागरे, नामदेव चव्हाण, विमल खाबीया, आजमभाई शेख तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक आधोडे सर, राजगुरु सर, संजीवनी बॅकेचे बँकेचे सुरेश जाधव, माजी चेअरमन किरण चव्हाण ,जी प शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण तसेच पोलीस पाटील देवेश माळवदे, आण्णासाहेब पगारे, संदीप भाटे, अशोक माळवदे, वीरभद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, जी प शाळा धोत्रे येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, उर्दु शाळेचे  मुख्याध्यापक व शिक्षकवृंद गावातील आजी माजी पदाधिकारी समस्त ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या  झेंडावंदन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षक संजय रोकडे सर यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे