आपला जिल्हा

धोत्रे मराठी शाळेतील  कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरावर  निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव

धोत्रे मराठी शाळेतील  कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरावर  निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
धोत्रे गावच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील सर्वात मोठी असणारी जिल्हा परिषदेची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धोत्रेचे विद्यार्थी कायमस्वरूपी कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये नेहमीच शाळेचे व गावाचे नाव गुणवत्ता यादीमध्ये सिद्ध करत असतात. नुकतीच तालुकास्तरावर  झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांचा व मुलींचा कबड्डीचा संघ तसेच थाळीफेक गोळा फेक यामध्ये धोत्रे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे व गावाचे नाव जिल्हास्तरापर्यंत पोहोचविले असून या यशाबद्दल प्रजासत्ताक दिनी  धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप  चव्हाण व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी स्वतःच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत गौरव केला व शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामागे विद्यार्थ्यांमध्ये असलेली कला व त्या कलेला प्राप्त करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली योग्य मार्गदर्शन केले असे शालेय शिक्षक संतोष पेंढारे, नितीन वायाळ, जोशी सर, सागर करडे, रोकडे सर, गोडे सर ,भिसे सर,डोळस सर, कडू सर, अनर्थे सर, मोरे सर ,थोरात सर,गावित मॅडम ,शाळेचे मुख्याध्यापक मुसमाडे सर आदी सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनातून शाळेचे नाव आज जिल्हास्तरावर पोहोचविल्या त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचे गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख विलास भांड, सरपंच प्रदीप चव्हाण, अध्यक्ष प्रविण चव्हाण यांच्यासह गावचे उपसरपंच, ग्रामस्थ,शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही आपल्या शाळेचे व गावाचे नाव जिल्हा पातळीवरत विजयी होऊनच परतू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे