आपला जिल्हा

साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल कासली या शाळेत २६ जानेवारी म्हणजेच ७६ वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, प्रकाश शिंदे, लताबाई आगवन, नितीन शिंदे, प्रा योगेश शिंदे, विलास पाठक, अमोल गायकवाड, गणेश शिंदे, विकास भिंगारे, अमोल भालेराव, संपत मलिक,रामनाथ पगार आदी मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मधील कवीश शिंदे, धनश्री पगार,शंभू आहेर, शिवांश मलिक, राघव शिंदे, गुंजन भिंगारे, आदित्य आहेर, खुशी गायकवाड,यश शिंदे, शिवा शिंदे, शिवण्या शिंदे, पूर्वी शिंदे, आयुष पाठक, आदित्य भालेराव आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशा प्रती इंग्लिश हिंदी मराठी भाषेत भावना व्यक्त करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

तर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त सहभागी सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपट धार्मिक देशभक्ती वर आधारित गाण्यावर नृत्य कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पालकांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकारी वर बक्षिसांचा वर्षाव केला तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक विजय जाधव, शालेय शिक्षिका संपदा चरमळ, आयुब शेख, अलका जाधव आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थापक परशराम साबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे