आपला जिल्हा

राष्ट्रवादीच्या रेट्यामुळे अखेर प्रभाग क्र.११ मधील रस्त्याच्या कामांना प्रारंभ-नगरसेविका  सोनम त्रिभुवन

राष्ट्रवादीच्या रेट्यामुळे अखेर प्रभाग क्र.११ मधील रस्त्याच्या कामांना प्रारंभ-नगरसेविका  सोनम त्रिभुवन

राष्ट्रवादीच्या रेट्यामुळे अखेर प्रभाग क्र.११ मधील रस्त्याच्या कामांना प्रारंभ-नगरसेविका  सोनम त्रिभुवन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १८ मे २०२६ :- कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ११ मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होवून नागरीकांना हि कामे लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित होती. परंतु कोपरगाव नगरपरिषदेच्या अडचणीमुळे हि कामे सुरु होत नव्हती. त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अनेकवेळा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून अखेर या रस्त्याच्या कामांना सोमवार (दि.१८) पासून प्रारंभ झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ.सोनम त्रिभुवन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

जाहिरात

प्रसिद्धी पत्रकात नगरसेविका सौ.सोनम त्रिभुवन यांनी पुढे असे म्हटले आहे की, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे अंतर्गत प्र.क्र.११ मधील वाघ घर ते कन्या शाळा रस्ता अंतर्गत रस्ता करणे (६० लाख), व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत बालाजी अंगण ते किरण मवाळ घर रस्ता डांबरीकरण करणे (८.४५ लाख) अशा एकूण ६८.४५ लाखाच्या रस्त्यांच्या कामांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मागील चार ते पाच महिन्यापूर्वी या कामाचे भूमिपूजन देखील झाले होते.परंतु कोपरगाव नगरपरिषदेच्या अडचणीमुळे हि कामे सुरु होत नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अनेकवेळा कोपरगाव नगरपरिषदेला निवेदने दिली.

जाहिरात

विकासकामांना वेळेवर निधी उपलब्ध होत नाही येथे तर आमदार आशुतोष काळे यांनी निधी देवूनही विकासकामे सुरु होत नसल्यामुळे नागरीकांच्या अडचणी वाढल्या होत्या.पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असतांना तत्पूर्वी रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्याची कामे होणार नव्हती आणि पावसाळ्यात रस्ता डांबरीकरण कामे करणे शक्य देखील नव्हते. त्यामुळे या रस्त्याच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्यातून अखेर या रस्त्याच्या कामांना सोमवार (दि.१८) पासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे प्र.क्र.११ मधील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरीकांनी आमदार आशुतोष काळे व रस्त्याचे काम सुरु व्हावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे आभार मानले आहे.

जाहिरात
नगरसेविका सोनम त्रिभुवन

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे