आपला जिल्हा
प्रियदर्शनी बीएस्सी व बीसीएचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा शुभारंभ

प्रियदर्शनी बीएस्सी व बीसीएचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा शुभारंभ

कोपरगाव विजय कापसे दि १७ जानेवारी २०२६– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित, बीएस्सी व बीसीए महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ संवत्सर येथे संस्थेचे कार्यकारी अधिकारी राजेश परजणे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि १६ जानेवारी रोजी झाला.

तर या शिबिर कालावधीत “शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापन” या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक जनजागृती चे काम केले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महिला सबलिकरण, आरोग्य, साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान, पथनाट्य, जनजागृती रॅली, गाव सर्वेक्षण, वृक्षारोपण, जल संवर्धन इत्यादी उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याच बरोबर विद्यार्थिनी व ग्रामस्थांसाठी विविध विषयावर तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करून सामाजिक जनजागृती चे काम केले जाणार आहे.








