विखे-पाटील

डॉ सुजय विखेच्या उपस्थित नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा जल्लोष साजरा

डॉ सुजय विखेच्या उपस्थित नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा जल्लोष साजरा

डॉ सुजय विखे यांचा वाढदिवस देखील जल्लोषात साजरा

आभार जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २४ नोव्हेंबर २०२४संगमनेर तालुक्याची विकास प्रक्रीया साध्य करण्यासाठी यापुढे आम्ही सेवक म्हणून काम करणार आहोत. कोणीच साहेब नाही, तर सर्वसामान्य जनताच आमदार आहे. या तालुक्यातील प्रलंबित असणारे अनेक प्रश्न आपल्याला सर्वांना पाच वर्षामध्ये सोडवायचे आहे केवळ संगमनेरात नव्हे तर राज्यात परिवर्तन झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्या नंतर मुख्यमंत्र्यांना भेटून पठार भागावर उपसा जलसिंचन योजना मंजूर करून आणण्याची ग्वाही माजी खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात देवकर

संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यानंतर मालपाणी लॉन्स येथे डॉ सुजय विखे यांचा वाढदिवस व सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी माजी खासदार डॉ विखे बोलत होते.

जाहिरात पहाडे

डॉ विखे म्हणाले म्हणाले की, अमोलचा विजय हा सर्वांचा असून सर्वांचे हे यश आहे. कोणत्या एकटाचे यश नाही. त्यामुळे आज आपण संगमनेरात परिवर्तन करू शकलो.संगमनेर विधानसभेचा आमदार खताळ नसून आपण सर्व जण असणार सगळ्यांना न्याय मिळणार आहे. कोणीही आमदार म्हणायचे नाही भाऊ म्हणून हाक मारायाची आहे. आरोग्य, पाणी हे सर्व देण्याची जबाबदारी आपली आहे. पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहे. ही सत्ता सर्व सामान्य माणसांची आहे प्रत्येक वाडी वस्तीवर आपल्या पोहोचायचे आहे. जो व्यक्ती त्याच्या गावात प्रश्न सोडवेल त्याला यापुढे संधी दिली जाईल. कारण सरकार आपले त्यामुळे विकासाची काम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात लकारे

तालुक्यातील अनेक वर्षांपासून जे प्रलंबित प्रश्न आहे. त्यांना मार्गी लावायचे आहेत.जनसेवा मंच या अॅपच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. कोणत्याही नेत्यापुढे अर्ज घेवून फिरावे लागणार नाही. आता अनेक लोक आपल्याला दबावात घेण्याचा प्रयत्न करतील पण आता घाबरायचे कारण नाही.

जाहिरात लहिरे

गोरगरीब जनतेचा आवाज आता याठिकाणी ऐकला जाणार आहे. कोणाला धमकवणे, अपशब्द वापरणे हे आपल्या करायचे नाही. आता आपल्या आत्मसन्मानाने काम करायचे आहे. चाळीस वर्षाचा राग तुम्ही सर्वसामान्‍यांनी मतपेटीतून दाखवला आहे. आपल्या गाड्या जाळल्या, लोकांना मारले पण आता आपल्याला विकासाचे राजकारण करायचे असून तळेगाव, पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. आपल्या मनातील राग शांत करून आता आपल्याला विकास करून दाखावयचा आहे.

जाहिरात निखाडे

आजची सभा आमची शेवटची आहे. तुम्ही देखील पराभाव मान्य कारावा पण तुम्ही इथून पुढे आमच्या एकाही माणसाला हात लावला तर टायगर अभी जिंदा आहे. वाघ जेव्हा शांत होतो तेव्हा कोणी खडे मारायचे नाही. मात्र वाघ दबक्या पावलाने पुढे जावून काय करतो हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. माझ्यात आणि तुमच्यात संगमनेर मधील कोणताच पुढारी येणार नाही याचा तुम्हाला मी विश्वास देतो. तुमच्या विश्वासाला कधीच मी तडा जावून देणार नाही असा शब्द त्यांनी दिला.

जाहिरात जगताप

आमदार अमोल खताळ म्हणाले की जनसेवेचा घेतल्याने आज माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसावर जनतेन विश्वास टाकला त्यामुळे मी आज निवडणून आलो आहे. सहाशे कोटी रूपयांची विकास कामे महायुती सरकारने केली आहे. ज्यांना चाळीस वर्षात पाणी प्रश्न सोडवता आला नाही. त्याची दहशत वाढली होती. मात्र ही दहशत मोडण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. हा विजय लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यामुळे झाला आहे.

जाहिरात म्हस्के

राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांच्या माध्यमातून कामे करायची आहे विखे यांचा मी आयुष्यभर ॠणी राहिल. माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला संधी दिली आणि मला आमदार केले आहे. मी फिरत असताना अनेकानी मला साथ दिली.

जाहिरात जोशी

पाणी आणि रोजगाराचा प्रश्न सोडवणार आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन करून माझे अभिनंदन केले.माझ्या बरोबर दिवस रात्र सर्वसामान्य माणसांनी काम केले ते कधीही विसरू शकणार नाही. भविष्यात संगमनेर तालुका विकासाभिमुख आणि भयमुक्त करायचा आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे