महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील- तालुका अध्यक्ष संदिप सोनवणे
महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील- तालुका अध्यक्ष संदिप सोनवणे
महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील- तालुका अध्यक्ष संदिप सोनवणे
राहाता विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२४– शिर्डी शहराचा व मतदार संघाचा साधलेला विकास, केलेली कामे, नवनवीन प्रकल्प तसेच महायुती सरकारने राबविलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली असून, विरोधकांच्या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील यांना मतदार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदिप सोनवणे यांनी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच शिर्डी येथील साई संगम हॉटेल येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते होते याप्रसंगी राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे शिर्डी शहरातील ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर, शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे निलेश कोते, अमित शेळके, शहराध्यक्ष दीपक गोंदकर, युवक अध्यक्ष निलेश शिंदे, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, फकीरशेठ लोढा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप सोनवणे म्हणाले की, मंत्री विखे पाटलांनी नेहमीच सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या कल्याणाच्या योजना राबविलेल्या आहे. मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी शहरात विविध विकास प्रकल्प आणले आहेत. त्याचबरोबर औद्योगिक वसाहत, थिमपार्क, विमानतळ यासह इतर विकासात्मक प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे विखे पाटील यांनी केलेले प्रत्येक विकास काम असो अथवा इतर लोकहीताच्या योजना, भविष्यातील विकासाचे प्रकल्प याची माहिती घरोघर व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे ती जबाबदारी आपण पार पाडून मंत्री विखे पाटलांना विक्रमी मतांनी विजयी करू असा विश्वास आहे यावेळी त्यांनी बोलून दाखविला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरला असून, हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीची ताकद दाखवून देत मंत्री विखे यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता अगदी स्वतःची निवडणूक समजून या निवडणुकीत उतरलेला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वाधिक मते मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अथक प्रयत्न करीत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी कधीही मंत्री विखे पाटील यांच्या विरोधात काम केलेले नाही कारण मंत्री विखे पाटील हे कधीच जात धर्म पंथ अथवा पक्ष बघत नाही तर आपल्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाचे काम मार्गी लावण्यावर त्याचे प्रश्न सोडविण्यावर भर देतात व संबंधिताचे प्रश्न कायमचे सोडवून टाकतात याचा अनुभव मला सुद्धा आहे आम्ही कार्यकर्ते निस्वार्थपणे प्रचार करून विखे पाटील यांना निवडून आणणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी सांगितले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकीरशेठ लोढा यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री विखे पाटील यांच्याबरोबर फोटोसेशन करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही त्यांनी सर्वांना फोटो काढून देण्यासाठी वेळ देत आपलं सामान्य पण दाखवून दिले.