विखे-पाटील

फसवणूक करणा-या महाविकास आघाडी पासून दुरच राहा- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील 

फसवणूक करणा-या महाविकास आघाडी पासून दुरच राहा- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील 

फसवणूक करणा-या महाविकास आघाडी पासून दुरच राहा- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील 

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२४महाविकास आघाडीच्‍या जाहिरनाम्‍यावर सामान्‍य जनता विश्‍वास ठेवायला तयार नाही. कारण लोकसभेमध्‍ये झालेल्‍या फसवणूकीचा जनतेला अनुभव आहे. आठ हजार रुपये खटाखट देणारे कुठे पळून गेले हे समजले नाही. या तालुक्‍यातही लाडक्‍या बहीणींना योजनेपासून दुर ठेवण्‍याचा जाणीवपूर्वक प्रयत्‍न झाल. या फसवणूक करणा-या महाविकास आघाडी पासून दुरच राहा असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

जाहिरात

       तालुक्यातील  येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील यांनी थोरातांच्‍या निष्‍क्रीय कार्यपध्‍दतीवर निशाना साधला. आमच्‍यावर दहशतीचा आरोप करता, आमची दशहत ही विकासाची आहे. तुमच्‍या सारखी धाक दडपशाहीची नाही. अनेक वर्ष तालुक्‍याची सत्‍तास्थान तुमच्‍या ताब्‍यात आहेत पण अद्यापही तुम्‍ही अनेक गावांना पाणी देवू शकला नाहीत. आजही पिण्‍याच्‍या पाण्‍याचे टॅकर सुरु आहेत. २००५ सालचा समन्‍यायी पाणी वाटप कायदा यांच्‍या काळातच लागु झाला. यामुळे जिल्‍ह्याच्‍या पाण्‍याचे नुकसान झाल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

जाहिरात

       लोकसभा निवडणूकीत खोटा प्रचार करुन, तुम्‍हाला यश मिळाले असेल परंतू या विधानसभेत तशी परिस्थिती आता नाही. जनतेला तुम्‍ही पुन्‍हा  फसवू शकणार नाहीत. महायुती सरकारच्‍या योजनांवर जनतेचा विश्‍वास आहे. लाडक्‍या बहीणींसाठी सुरु केलेल्‍या योजनेमुळे तुम्‍हाला धडकी भरली आहे म्‍हणूनच या तालुक्‍यातील अनेक महीलांना या योजनेपासून वंचित ठेवण्‍याचे काम केले. इतके वर्ष सत्‍तेत असूनही अशी योजना सुरु करावी हे तुम्‍हाला वाटले नाही. आता मत मागण्‍यासाठी तीन हजार रुपयांची घोषणा तुम्‍ही कली आहे पण ती किती फसवी आहे हे जनतेला समजले आहे. कारण लोकसभेला कबुल केलेले आठ हजार सुध्‍दा तुम्‍ही देवू शकला नाहीत.

       राज्‍य सरकार हे नेहमीच शेतकरी आणि सर्व समाज घटकांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहे. येणा-या काळात कर्जमाफी योजना शेतक-यांसाठी सुरु करणार असून, एक रुपयात पी‍क‍ विमा योजनेमुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला. महाविकास आघाडीचे शेतकरी प्रेम हे फक्‍त बोलण्‍यापुरते आहे. अडीच वर्ष त्‍यांचीही सत्‍त होती पण शेतक-यांना दमडीचीही मदत ते करु शकले नाही याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे