शहर व तालुक्यातील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढा- अमर कतारी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन
शहर व तालुक्यातील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढा- अमर कतारी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन
संगमनेर विजय कापसे दि ७ जानेवारी २०२५–संगमनेर शहर व तालुक्यात विशिष्ट राजकीय पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स हे अनाधिकृत व अधिकृत वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ ठेवले गेले आहेत. प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष होणे हे हे अत्यंत चुकीचे असून संगमनेर शहरामध्ये मुख्याधिकारी व तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने सूचना देऊन हे सर्व फ्लेक्स त्वरित काढावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा शिवसेना नेते अमर कतारी यांनी दिला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अमर कतारी यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवसांपासून काही पक्षांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचे फ्लेक्स अनेक दिवसांपासून संगमनेर बस स्थानक परिसर व संपूर्ण शहरांमध्ये आहे. याला कोणतेही परवानगी नाही. किंवा परवानगीच्या मुदतीत संपून गेलेल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्यावर अद्याप कोणतेही कारवाई केलेली नाही.
याचप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्व फ्लेक्स अनाधिकृत व वेळेच्या मर्यादा पेक्षा जास्त काळ ठेवलेले आहेत. या वेळेच्या मर्यादा व त्या शुल्काबाबतची जबाबदारी ही संबंधित ग्रामसेवकांची आहे मात्र ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या फ्लेक्स ची दुरावस्था होऊन सामाजिक मतभेद वाढू शकतात अनेक दिवसांचे फ्लेक्स असल्याने काही ठिकाणी फाटले आहेत किंवा काही खराब झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा अस्थिर होऊन वाद निर्माण होतील.
इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या मुख्य रस्त्यावर एका विशिष्ट पदाधिकाऱ्याचे अनाधिकृत फ्लेक्स आहेत. इतके दिवस फ्लेक्स कसे राहू शकतात असा प्रश्न विचारताना हा नियम सर्वांना सारखा आहे का आणि दुसरे असे याचे शुल्क भरलेले आहेत का? हाही खुलासा होणे गरजेचे आहे तरी तातडीने महामार्गावरील सर्व अनाधिकृत फ्लेक्स, बस स्थानकाजवळ असलेले फ्लेक्स तसेच अनेक गावांमध्ये खूप दिवसांपासून लावले गेलेले फ्लेक्स हे दोन दिवसांमध्ये तातडीने काढण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात येईल . याचबरोबर या अस्थिर होणाऱ्या परिस्थितीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महामार्गाचे अधिकारी त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जबाबदार असतील. तरी त्यांनी तातडीने गावांमधील ग्रामसेवक व शहरातील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत हे अनाधिकृत फ्लेक्स त्वरित काढले पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे
गावागावातूनही अनाधिकृत फ्लेक्स हटवण्याची मागणी
अनेक गावांमधून अनाधिकृत फ्लेक्स हे वेळेच्या पेक्षा जास्त दिवस लावले गेले आहेत याबाबत ग्रामपंचायत मधून ग्रामसेवकांनी अत्यंत दुर्लक्ष केलेले दिसते. काही गावांमध्ये फ्लेक्स फाटले असल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये गावातील कार्यकर्त्यांमध्ये भांडणे होऊ शकतात यामुळे सर्व ग्रामसेवकांनी तातडीने फ्लेक्स काढले पाहिजे अशी मागणी जेष्ठ नागरिक पंढरीनाथ गुंजाळ, बाबुराव दिघे, तात्या पाटील राहणे, राजु खरात आदींसह शहरातील व्यापाऱ्यांनी केले आहे