संगमनेर

देशपातळीवर सहकाराचा तालुका अशी  संगमनेरची नवी ओळख  भाऊसाहेब थोरात यांनी निर्माण केली – डॉ जयश्रीताई थोरात.

देशपातळीवर सहकाराचा तालुका अशी  संगमनेरची नवी ओळख  भाऊसाहेब थोरात यांनी निर्माण केली – डॉ जयश्रीताई थोरात.
स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवानिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न
संगमनेर विजय कापसे दि ७ जानेवारी २०२५

दुष्काळ प्रवण अशा संगमनेर तालुक्यात विविध संस्था उभारून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी  देशपातळीवर सहकाराचा तालुका अशी नवी ओळख निर्माण केली असून उद्याचे भविष्य असणारे  विद्यार्थी हे भविष्यातील सहकाराशी निगडित असल्याचे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले.

जाहिरात
    भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालयात जयंती महोत्सव वकृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे,  प्रा बाबा खरात, सौ.सौदामिनी कान्होरे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रार व जयंती महोत्सव वकृत्व स्पर्धेचे समन्वयक  बाबुराव गवांदे ,  प्रकल्प प्रमुख एस एम खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती महोत्सव वकृत्व स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख श्री एस एम खेमनर सर यांनी , थोर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवनकार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी या उद्देशाने या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे .स्पर्धेचे हे नववे वर्ष असून संगमनेर अकोले तालुक्यातील विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभत शाळा , कॉलेज व महाविद्यालयातील ६४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असल्याचे सांगितले.

जाहिरात

          इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटात  स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात, मोबाईलच्या जगात हरवले कुटुंब.या विषयावर झालेल्या स्पर्धेत
 प्रथम क्रमांक कु.ज्ञानेश्वरी राम आहेर , भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर.द्वितीय क्रमांक कु जागृती राजेंद्र सांगळे,भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबाविद्यालय रहिमपूर तृतीय क्रमांक कु समृद्धी संदीप घुले हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालय निमोण चतुर्थ क्रमांक कु.वेदांती राजाराम शिंदे, मातोश्री रु.दा.मालपाणी विद्यालय संगमनेर पंचम क्रमांक कु.स्वीटी अंबादास लष्करे, काशेश्वर विद्यालय कासार दुमाला.   इयत्ता आठवी ते दहावी या मध्यम गटात, संगमनेर तालुका विकासाचे दीपस्तंभ स्व. भाऊसाहेब थोरात, महात्मा गांधी यांची शिकवण या विषयावर झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु गार्गी चंद्रकांत घुले, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेर द्वितीय क्रमांक कु गायत्री विजय गोसावी, भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा विद्यालय रहिमपूर तृतीय क्रमांक कु श्रावणी विठ्ठल बोंबले, चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी चतुर्थ क्रमांक कु.ज्ञानेश्वरी तुषार गायकर भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर पंचम क्रमांक कु.पृथा सोमनाथ घुले, अमृतवाहिनी मॉडेल स्कूल संगमनेर.यांनी मिळवला.

जाहिरात
     इयत्ता अकरावी व बारावी या कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी  कृषीक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे, विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल .या विषयावर झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु दिव्या अजय थेटे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज, संगमनेर. द्वितीय क्रमांक कु प्रांजली प्रवीण धुमाळ मारोतराव कोते पाटील अभिनव कॉलेज अकोले,  तृतीय क्रमांक कु गायत्री रावसाहेब उगले, चंदनेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय चंदनापुरी , चतुर्थ क्रमांक कु.तनुजा रवींद्र आरोटे ,श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर, पंचम क्रमांक कु प्रणिता संपत जेडगुले, नूतन माध्यमिक महाविद्यालय राजापूर.

जाहिरात

    तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटात सहकारातील राजहंस सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात,  भारतातील युवकांची जागतिक युवक म्हणून वाटचाल या विषयावर झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु आश्लेषा अच्युत आरोटे, संगमनेर महाविद्यालय संगमनेर. द्वितीय क्रमांक उत्कर्षा नंदू कोल्हे ,मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर. तृतीय क्रमांक कु. अश्विनी चंद्रकांत फटांगरे, बी एस टी महाविद्यालय संगमनेर. चतुर्थ क्रमांक कु. करिष्मा नवनाथ माने अगस्ती महाविद्यालय अकोले. पंचम क्रमांक कार्तिक शैलेश जोशी ,संगमनेर, महाविद्यालय संगमनेर या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ प्रा.  राजेंद्र कोल्हे , श्रीमती प्रा. रंजना कदम,  विठ्ठल नाईकवाडी ,प्रा. श्री एस के भालेराव, प्रा डॉ राजेंद्र पठारे,प्रा. डॉ हनुमंत कुरकुटे, प्रा डॉ शशिकांत बांगर,यांनी काम पाहिले.

जाहिरात
या जयंती महोत्सव वकृत्व स्पर्धा  यशस्वीतेसाठी  वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ‌ बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य  कोल्हे सर, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य  सुरसे ,प्रकल्प प्रमुख एस एम खेमनर , संस्थेचे संजय आहेर ,प्रा.जोरवर आर एस, ,प्रा.भवर सी जी , किशोर शिंदे , ज्येष्ठ शिक्षक  पिंगळे बी आर,  कुदळ बी व्ही,  देशमुख के डी , नाईक जे आर, श्रीमती कदम आर एम, श्रीमती थिटमे एस ए ,शिक्षकेत्तर सेवक   टपले ए यु,  होडगर डी आर,आदींनी विशेष परिश्रम घेतले.  या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  पिंगळे बी आर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य   बाळासाहेब वाघ यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे