परजणे महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात साजरा
मुलींनो आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा- प्रा हंबीरराव नाईक
कोपरगाव विजय कापसे दि ८ जानेवारी २०२५– मुलींनो न घाबरता कोणाचाही विचार न करता आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करत आपले, आपल्या शाळा महाविद्यालयाचे, गावचे, आपल्या आई-वडील शिक्षकांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात उंचवावा असा मौखिक सल्ला प्रा. हंबीरराव नाईक यांनी प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित कोपरगाव येथील बीएससी व बीसीए महिला महाविद्यालय, नामदेवराव परजणे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा हंबीरराव नाईक, कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, संस्थेच्या सचिव मीरा काकडे, लॉ कॉलेजचे संस्थापक हिरालाल महानुभव, पत्रकार फकीरराव टेके, पत्रकार विजय कापसे, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री विखे पाटील, पद्मभूषण विखे पाटील व नामदेवराव आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करत विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात होऊन मान्यवरांच्या शुभहस्ते विविध गुणदर्शन स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा व इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तर सर्व विद्यार्थिनीनी वेगवेगळ्या हिंदी मराठी गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी सादर केलेला नृत्यावर उपस्थित सर्वांची वाहवाह मिळवली.
या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी अधिकारी राजेशआबा परजणे यांनी स्व.नामदेवराव आण्णा व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या फक्त मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालय स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट करत मुलींनी आवश्यकतेनुसार मोबाईलचा वापर करत जास्तीत जास्त थोर महापुरुषांच्या संत महंतांच्या जीवन चरित्राचे वाचन करत त्याचा अवलंब आपल्या जीवनात करावा असा सल्ला देत सर्व विद्यार्थीनीना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर हिरालाल महानुभव यांनी देखील सर्वाना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा पूनम बोटे यांनी तर उपस्थितांचे आभार शालेय शिक्षिका सुमया शेख यांनी व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सोनवणे दत्तात्रय, प्राचार्य साईप्रसाद खर्डेकर, प्राचार्य प्रियंका घोलप- घाटे यांच्या सह शैलेश कुलकर्णी, रंजना बारगळ, भारती करपे , माया दवणे, पूनम जीभकाटे , आनंद शिंदे , सुजाता गोंडे , मनीषा देव्हडे , रोहिणी परजणे, जयश्री वाघ, मीना लावरे, वैशाली पानगव्हाणे, पूजा बाविस्कर, सुमया शेख, ज्योती म्हस्के, मीनाक्षी चव्हाण, पुनम बोठे, सुनीता शेळके,पूनम लहुंडे, गणेश घाटे, शिंदे मामा, कांबळे मामा, होन ताई, आरणे ताई आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक महिला उपस्थित होत्या.