वारी शाळेच्या बालआनंद मेळाव्यात २५ हजारांची उलाढाल
वारी शाळेच्या बालआनंद मेळाव्यात २५ हजारांची उलाढाल
कोपरगाव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२४: तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच शैक्षणिक उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी साधारण २०० स्टॉल लावले होते. या स्टॉलच्या माध्यमातून सुमारे २५ हजार रुपये पर्यंतची आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांच्या हस्ते फित कापून पालकांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवरांना आकर्षक कागदी रंगीत टोप्या घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.जाहिरात
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा कोपरगाव बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिपाली बनभेरू, सदस्य परसराम टेके, राजेश काबरा, जयसिंग बनगया, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा टेके, सोनाली महापुरे, प्रकाश टेके, नंदू जाधव, डॉ. सर्जेराव टेके, जितेंद्र टेके, जालिंदर गहिरे, आदिनाथ वायडे, प्रशांत संत, शिवाजी टेके, शशिकांत जाधव, अमोल वाघ, हरिभाऊ टेके, नामदेव जाधव, सुभाष कर्पे उपस्थित होते.जाहिरात
या आनंद मेळाव्यात ३० भाजीपाला, फळांचे स्टॉल तसेच खाऊ गल्लीत साधारणपणे ७० स्टॉल लावण्यात आले होते. त्याचबरोबर विविध प्रकारचे रंजक खेळ यावेळी बालआनंद मेळाव्याचे प्रमुख आकर्षण होते. मेळाव्यासाठी पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. गावातील प्रमुख व्यवसायिकांनी यावेळी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून सदर मेळाव्याकडे गिर्हाईकांची पावले वळवून उपक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावला.
उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख विलास भांड यांनी शुभेच्छा दिल्या.उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, शिक्षक सुधाकर अंबिलवादे, दत्तात्रय चव्हाण, भागा जाधव, गोरक्षनाथ साबळे, पांडुरंग खाडे, प्रवीण आहेर, गोविंदा पोरे, अरुण पवार तसेच शिक्षिका शर्मिला विधाटे, सुनीता डोखळे यांनी विशेष परिश्रम घेऊन उपक्रम पालक सहभागातून यशस्वी केला.जाहिरात
स्टॉल धारकांसाठी लकी ड्रॉ.
बालआनंद मेळाव्यात उपक्रमशील पालक अशोक मोहरे यांनी रंजक पद्धतीने कुपन लकी ड्रॉ हा खेळ प्रत्येक स्टॉल धारकासाठी ठेवला होता. यातून त्यांनी विद्यार्थ्यांना रंजक तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे यावेळी वाटप करण्यात आले.
पैसे स्वीकारण्यासाठी क्यू.आर कोड.
श्रेयस संत या विद्यार्थ्याच्या खमंग ढोकळा स्टॉलच्या विक्रीचे पैसे स्वीकारण्यासाठी डिजिटल क्यू आर कोड चा वापर केल्याने सदर बाब ही कौतुकाचा विषय बनली होती.