आपला जिल्हा

मथुराबाई पाचोरे यांचा सोमवारी दशक्रिया विधी

मथुराबाई पाचोरे यांचा सोमवारी दशक्रिया विधी
मथुराबाई पाचोरे यांचा सोमवारी दशक्रिया विधी
कोपरगांव विजय कापसे दि १९ मार्च २०२६- कोपरगांव तालुक्यातील बहादराबाद येथील सामाजीक कार्यकर्त्या मथुराबाई रंगनाथ पाचोरे (वय ८७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्या सक्रिय सहभागी होत्या. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्या परिसरात सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या मागे पती, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा जाण्याने बहादराबाद गावात शोककळा पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक  रंगनाथ बाळाजी पाचोरे यांच्या त्या पत्नी होत्या .त्याचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक २३ मार्च रोजी  बहादराबाद येथे राहत्या घरी होणार आहे. या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व दत्त ध्यान मंदिर शहा कारवाडी चे प्रमुख ह.भ.प.संतोष भाऊ जाधव  यांचा प्रवचनाचा कार्यक्रम ठीक सकाळी ८ वाजता संपन्न होईल.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे