विविध मान्यवरांच्या गौरवाने माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक ठरली विशेष

विविध मान्यवरांच्या गौरवाने माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक ठरली विशेष
विविध मान्यवरांच्या गौरवाने माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक ठरली विशेष
Kopargaon vijay kapse दि २५ मे २०२६ : महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत श्रद्धांजली, अभिनंदन प्रस्ताव तसेच आगामी उपक्रमांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या पत्नी कै. शशिकला रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय जबाबदाऱ्या प्राप्त झालेल्या मान्यवरांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

कोपरगाव तालुक्याचे युवा नेते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दलही सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. भगीरथ शिंदे यांची पुन्हा व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच ॲड. संदीप वर्पे व सुरेश बोळीज यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

याच बैठकीत महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष पवार यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘नारायण सुर्वे पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक व शैक्षणिक कार्याचा उपस्थितांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.

सभेमध्ये आगामी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनावरही चर्चा झाली. नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात मेळावा आयोजित करण्याबाबत प्राथमिक नियोजन यावेळी करण्यात आले. या बैठकीस माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप दारूण कर, खजिनदार डॉ. रामदास पवार, सचिव प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्यासह ॲड संदीप वर्पे, सुनील गंगुले, सचिन आव्हाड, गणेश आढाव, मनोज अग्रवाल, डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे, प्रसाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.



