साऊथ आफ्रिकेत साकारणार साईबाबांचे भव्य दिव्य मंदिर

साऊथ आफ्रिकेत साकारणार साईबाबांचे भव्य दिव्य मंदिर
साऊथ आफ्रिकेत साकारणार साईबाबांचे भव्य दिव्य मंदिर

शिर्डी विजय कापसे दि १९ जानेवारी २०२५– शिर्डीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विषय होता साउथ आफ्रिकेतील राकेश यांचा भव्य दिव्य मंदिर बांधण्याचा संकल्प. त्यांनी साईबाबांचे मंदिर कसे बांधणार याचे विवेचन केले साईबाबांची पवित्र मूर्ती सोबत ध्यान मंदिर, द्वारकामाई, मेडिटेशन सेंटर, साईबाबांच्या जीवनावर थीम पार्क, साई हेरिटेज सिटी या सोबत निवासस्थान व अनेक अध्यात्मिक उपक्रम नियोजित आहे.

विशेष असे की साउथ आफ्रिकेत ५२ देश आहेत सर्वात पहिले मंदिर या डरबन या ठिकाणी साकारतय. शिर्डी साईबाबा साउथ अफ्रिका असे या संस्थेचे नाव आहे सध्या ही संस्था इंटरनेट रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून साईबाबांच्या कथा व साईसतचरित्रचे वाचन करून व्हिएतनाम, ब्राझील सारख्या देशांमध्ये बाबांच्या विचारांची देवाण घेवाण करत आहे. सर्वात महत्त्वाचे राकेशजी हे सर्व स्वखर्चाने करत आहेत.

आज साईभक्त जे. पी. सिसोदिया यांनी सर्वांना एकत्रित करून सर्वांना अनोख्या साईभक्तीचे दर्शन घडविले. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व शिर्डी ग्रामस्थ प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिवसेना जिल्हा प्रमूख कमलाकर कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे,माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, माजी नगरसेवक दत्तू कोते, गायक पारस जैन, अनिल पवार, बाळू पाचोरे अरविंद महाराज. यांच्या प्रमुख उपस्थितीत राकेश महाराज यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनेक साईभक्त उपस्थित होते.
