आपला जिल्हा

युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी ज्ञानेश कपिले यांची नियुक्ती

युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी ज्ञानेश कपिले यांची नियुक्ती

युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी ज्ञानेश कपिले यांची नियुक्ती

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ जुलै २०२५राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने कोपरगाव येथील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवसैनिक ज्ञानेश वसंतराव कपिले यांची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ यांनी युवासेना अहिल्यानगर उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

जाहिरात

कपिल हे सध्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कोपरगाव तालुका प्रमुख असून त्यांनी याद्वारे अनेक गरजू रुग्णांना शासनाकडून मदतीचा हात दिला आहे याच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, शहर प्रमुख अक्षय जाधव, युवा सेना शहरप्रमुख सनी गायकवाड, सुनील साळुंखे, मनील नरोडे आदी शिवसैनिकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात

याविषयी नवनियुक्त युवासेना उपजिल्हाप्रमुख कपिले यांनी बोलताना सांगितले की, सामाजिक जीवनात काम करत असताना मिळालेले कोणतेही पद प्रतिष्ठेपेक्षा जास्त जबाबदारी वाढवते.शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक परिवार आहे त्यामुळे पक्षाचे ध्येय धोरणे विचारधारा तसेच ना.एकनाथ शिंदे यांनी समाजभिमुख केलेले कार्य मा.खा. सदाशिव लोखंडे , जिल्हा प्रमुख नितीन औताडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ यांच्या आदी वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदशनाखाली सर्वाना सोबत घेऊन तळागाळात पोहचवण्यासाठी काम करत पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जाहिरात
ज्ञानेश कपिले

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे