कोपरगाव तालुका केमिस्ट भवनचा रविवारी भव्य उद्घाटन समारंभ

कोपरगाव तालुका केमिस्ट भवनचा रविवारी भव्य उद्घाटन समारंभ
कोपरगाव तालुका केमिस्ट भवनचा रविवारी भव्य उद्घाटन समारंभ

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२५–अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संलग्नित कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या नूतन “कोपरगाव केमिस्ट भवन” या वास्तूचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी केमिस्ट हृदयसम्राट अखिल भारतीय व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील येवला रोड, शिव ऑटो सर्विस स्टेशन जवळ नव्याने निर्माण झालेल्या “कोपरगाव केमिस्ट भवन” च्या उद्घाटन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

तसेच या प्रसंगी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे, सेंट्रल झोनचे अध्यक्ष नरेश भगत, उपाध्यक्ष शशांक रासकर, सचिव महेश भावसार, माजी जिल्हाध्यक्ष जवाहरलाल शहा, सहायक आयुक्त आयुष्य अन्न व औषध प्रशासन अहमदनगरचे अशोक बर्डे, अन्न व औषध प्रशासन सातारा औषध निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, निमंत्रित सदस्य संजय अजित पारख, संचालक रवींद्र पवार, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन हेमंत मेतकर, संघटक सचिव सेंट्रल झोन चेतन कर्डिले, ओमप्रकाशजी गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र गुलाटी, अन्न व प्रशासनात औषध निरीक्षक जावेद शेख, अन्न व औषध प्रशासन औषध निरीक्षक माधव निमसे आदींच्या प्रमुख उपस्थित होणार असून तरी आपण या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, उपाध्यक्ष भरत मोरे यांच्यासह सर्व केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांनी केले आहे.

