काळे गट

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

जाहिरात आत्मा

कोळपेवाडी विजय कापसे दि ३० जानेवारी २०२५ – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचे वतीने हिवाळी परीक्षा २०२४ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली व महाविद्यालय शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून महाविद्यालयात  भाकरे हर्षदा बाबासाहेब ही ८७.८९% गुण मिळवुन प्रथम,  चव्हाण मयुरी दिगंबर ८७.५६ % मिळवुन द्वितीय,  बहिरट अखिलेश दगेश ८६.४४ % तृतीय आल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.

जाहिरात

महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल ९८.३८.% एवढा लागला असून प्रथम क्रमांक  अस्वले अंजली बाळासाहेब ८४.५९ %, द्वितीय क्रमांक  अबक प्रतीक्षा अनिल ८३.५३  %. तृतीय क्रमांक  करपे मयूर प्रवीण ८३.४१%, मिळविला आहे.

जाहिरात

द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९९% एवढा लागला असून यामध्ये मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक चि.सांगळे प्रज्वल संजय ७२%, द्वितीय  भोसले दीक्षा राजेंद्र ७१ %, तृतीय क्रमांक  घुमारे अर्जुन दत्तात्रय ६८.५६ %, द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक  डोलणार राहुल दत्तू ८१.१८ % , द्वितीय क्रमांक   मुरडणर अरुण नवनाथ ७९.७७%, तृतीय क्रमांक  गवांदे पूजा सोमनाथ ७५ %, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक  गोरे श्रुष्टी गोपीनाथ ८५.७७ %, द्वितीय क्रमांक  चव्हाणके सेजल प्रवीण८५.१८%, तृतीय क्रमांक  भागुरे समीक्षा दादासाहेब ८३.१८ %, द्वितीय वर्ष सिव्हील विभागात प्रथम क्रमांक  जाधव यशराज नरेंद्र ७५.७७ %, द्वितीय क्रमांक  कुंभार्डे प्रथमेश ७४ %, तृतीय क्रमांक  घुमारे ओमकार साईनाथ ७३.०६ % गुण मिळविले आहे.

जाहिरात

तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक  घोडेराव श्रावणी भीमराव ८४.५७%, द्वितीय एरंडे तेजस अनिल ८०.१ %, तृतीय क्रमांक  घोडेराव प्रियांका नाना ७७.४३ %, तृतीय इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक  सय्यद उमर निसार ७९.५० %, द्वितीय क्रमांक   जोरे यश संजय ७९.४० %, तृतीय क्रमांक  गवळी प्रियांका अनंत ७७.९० %, तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक भाकरे हर्षदा बाबासाहेब ८७.८९ %, द्वितीय क्रमांक  चव्हाण मयुरी दिगंबर ८७.५६ %, तृतीय क्रमांक  बहिरट अखिलेश दगेश ८६.४४ %, तृतीय वर्ष  सिव्हील विभागात प्रथम क्रमांक  बरसे साक्षी शांतीलाल ८२.३%, द्वितीय क्रमांक  कांगणे पूजा सोमनाथ ८०.६%, तृतीय क्रमांक  जाधव शुभम बाबासाहेब ७५% गुण मिळविले आहे.

जाहिरात

तृतीय वर्ष ऑटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक  आवारे कुणाल किरण ८१.४७ %, द्वितीय क्रमांक  वांदेकर रोहन संजय ७६.२१ %, तृतीय क्रमांक  जाधव चेतन ज्ञानेश्वर ७४.३२ % गुण मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव  चैतालीताई काळे, सहसचिव  स्नेहलताताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य  सुभाष भारती यांच्यासह सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

गौतम कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे