आपला जिल्हा

श्री.गोकर्ण गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

श्री.गोकर्ण गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

श्री.गोकर्ण गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२५कोपरगाव शहरातील कापड बाजार येथे प्राचीन काळापासून असलेले श्री गोकर्ण गणेश मंदिरात शनिवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी पहाटे श्री गणेश मूर्ती दुग्ध अभिषेक करून होम हवन करून पूजा करण्यात आली त्यानंतर गणेश भक्तांच्या उपस्थितीत आरती करून संपूर्ण दिवसभर मंदिरामध्ये होम हवन व पूजा विधी करण्यात आला त्यानंतर सायंकाळी ०७.०० वाजता उपस्थित गणेश भक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाआरती नंतर आलेल्या सर्व गणेश भक्तांसाठी कापड बाजार मित्रपरिवार बिरोबा चौक व रामराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

यावेळी अनेक गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी कापड बाजार बिरोबा चौक परिसरातील मित्रपरिवार व रामराज्य प्रतिष्ठान यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कापड बाजार बिरोबा चौक परिसरातील स्थानिक व्यापारी मित्र मंडळाचे व रामराज्य प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे सदरची श्री गणेश जयंती मोठ्या आनंद उत्साहात कापड बाजार या ठिकाणी संपन्न झाली.

जाहिरात

याप्रसंगी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला सदर श्री गणेश मंदिरामध्ये प्रसादाचा लाभ घेण्यासाठी कोपरगाव शहरातील अनेक श्री गणेश भक्तांची मांदियाळी दिसून आली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे