आपला जिल्हा

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात 

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात 
लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ जुलै २०२५नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव (ओमेगा) व लिओ क्लब समता (अल्फा) यांचा ५५ वा पदग्रहण व शपथविधी सोहळा अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात रविवार दि १३ जुलै रोजी  डी. पी. एम. जे. एफ. लायन गिरिजा मालपानी, शपथविधी अधिकारी म्हणून एम. जे. एफ. लायन रविंद्र गोलार, एम.जे.एफ. लायन संजय उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

जाहिरात

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी अक्षय गिरमे, सचिवपदी लायन संदीप राशीनकर, खजिनदार पदी अक्षय बोरा, लिओ क्लब ऑफ कोपरगाव (ओमेगा) अध्यक्षपदी लिओ धीरज कराचीवाला, सचिवपदी मानव नांगरे, खजिनदारपदी सम्यक फुलफगर, लिओ क्लब समता (अल्फा)च्या अध्यक्षपदी समर राजपूत,उपाध्यक्षपदी तीर्थ समदादिया, सचिवपदी इशान कोयटे,खजिनदारपदी सृती वक्ते आदींची निवड करण्यात आली.

जाहिरात
 या प्रसंगी तुलसीदास खुबाणी, संदीप कोयटे, राजेश ठोळे,  सुधीर डागा,  संदीप रोहमारे, राम थोरे,  सत्यन मुंदडा,  आनंद ठोळे,  सुरेश शिंदे, नरेंद्र कुरलेकर , सचिन भड़कवाड़े,पंकज ठोले, भरत अजमेरे, सुमित भट्टड़,  प्रसाद भास्कर, शैलेन्द्र बनसोडे, आदित्य गुजराथी , जय बोरा, ओंकार भट्टड, कुशल कोठारी पृथ्वी शिंदे आदी कोपरगाव लायन्स लियो पदाधिकारयासह शिर्डी,राहाता व संगमनेर येथील लायन्सचे पदाधिकारी  सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अभिजीत आचार्य व सुमित सिनगर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले उपस्थित सर्व मान्यवरांनी लायन्स व लिओच्या सर्व नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे