संजीवनीचे माजी विद्यार्थी डाॅ. आकाश खुराणा यांचेकडून संजीवनी विद्यापीठास अद्ययावत प्रयोगशाळा भेट

संजीवनीचे माजी विद्यार्थी डाॅ. आकाश खुराणा यांचेकडून संजीवनी विद्यापीठास अद्ययावत प्रयोगशाळा भेट
एआय तुमच्या नोकऱ्या हिरावुन घेणार नाही, असा डाॅ. खुुराणा यांचा सल्ला

Kopargaon vijay kapse दि १ जुलै २०२६: जागतिक वर्गवारीत पहिल्या ५०० कंपन्यांअंतर्गत (फाॅर्चुन ५००) स्थान असलेल्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, चिफ इन्फर्मेशन अँड डिजिटल ऑफिसर , वेस्को (युएसए) आणि संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डाॅ. आकाश खुराणा यांनी आपल्या मातृ संस्थेप्रती असलेली बांधिलकी आणि दातृत्व भावनेतुन संजीवनी युनिव्हर्सिटीला ‘डाॅ. सुधा अँड डाॅ. सतीश खरे इनोव्हेशन अँड मॅन्युफॅक्चरींग लॅब’ ही भव्य, अद्ययावत व आधुनिक उपकरणांनी सज्ज अशी प्रयोगशाळा भेट म्हणुन दिली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे, व्हाईस चांसलर डाॅ. ए. जी. ठाकुर, डाॅ. सतिश खरे, डाॅ. सुधा खरे, सुरभी खुराणा, संतोश काळे, गीतीका काळेे, डीन डाॅ. कविथा राणी, कार्पोरेट रिलेशन्स विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट इम्राण शेख, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

उद्घाटनानंतर डाॅ. खुराणा यांनी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नालाॅजीच्या विभागाच्या वतीने आयोजीत विध्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ‘करिअर २०३० अशा नोकऱ्यांची तयारी ज्या अजुन अस्तित्वात नाहीत’ या विषयावर मुलाखत व प्रश्नोत्तर स्वरूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ते म्हणाले की संपूर्ण जगात कृत्रिम बुध्दीमत्तेची (एआय) व्याप्ती वाढत असुन भविष्यात एआय तुमच्या नोकऱ्या हिरावून घेणार नाही तर एआय वापरणारी व्यक्ती तुमची जागा घेईल. कोणत्याही क्षेत्रात एआय माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही, उलट तो निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करतो. भविष्यातील शाश्वत नोकरीसाठी व जीवनातील हमखास यशासाठी आपल्या प्रकल्पांचे, उपलब्धींचे आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे प्रभावी सादरीकरण, तांत्रिक, व्यावसायिक आणि व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित आवश्यक कौशल्ये, आपल्या विद्या शाखेतील विषयांचे मुलभुत ज्ञान, सातत्यपूर्ण शिक्षण आणि बदलांशी जुळवुन घेण्याची क्षमता, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःला बदलण्याची तयारी, डिजिटल साधने आणि कृत्रिम बुध्दिमत्ता वापरण्याचे कौशल्य, इत्यादी पैलुंची रूजवण स्वतःमध्ये करणे गरजेचे आहे.

डाॅ. खुराणा यांनी भेट म्हणुन दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये रोबोटिक्स अँड इंडस्ट्री ४.०, स्मार्ट मॅन्युफॅक्चरींग अँड आयओटी, अॅडीटिव्ह मॅन्युफॅक्चरींग, पीएलसी अँड इंडस्ट्रिअल ऑटोमेशन , डीजिटल ट्वीन, औगमेंटेड व्हर्चुअल अँड एक्सटेंडेड रिअॅलिटी, आर्टिफिशिअल इंटिलिजंस, इत्यादी आधुनिक विषयांसदर्भातील उपकरणे आहेत. यामुळे नविन तंत्रज्ञानानुसार उद्योग जगताला अभिप्रेत असलेले अभियंते तयार होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



