आपला जिल्हा

राजा वीरभद्र यात्रेनिमित्त संवत्सरला बुधवारी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन

राजा वीरभद्र यात्रेनिमित्त संवत्सरला बुधवारी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन

राजा वीरभद्र यात्रेनिमित्त संवत्सरला बुधवारी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १० फेब्रुवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील बिरोबा चोक येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामदैवत श्री राजा वीरभद्र महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर) यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार असून भाविकानी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजा वीरभद्र मंडळ पंच कमेटी व संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

जाहिरात

श्री राजा वीरभद्र महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त बुधवार दि. १२ रोजी पहाटे ४ ते ९ वाजेपर्यंत मंदिरात विधी व पूजन, सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत कावडीची मिरवणूक, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे किर्तन, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत काठी पूजन व काठीची मिरवणूक, रात्री ९ वाजता भजनी मंडळाचा भजन व जागर कार्यक्रम होणार आहे. तर गुरुवार दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता होईकाचा कार्यक्रम होणार आहे.

जाहिरात

या यात्रेनिमित्त व्यावसायिकांच्या दुकाना थाटल्या जाणार आहेत. त्यात विविध खेळणी, मिठाई, प्रसाद, कपडे अशा दुकानांचा सहभाग असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचा व किर्तन सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

जाहिरात
देशमुख महाराज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे