आपला जिल्हा

शारदानगर वासीयांनी मानले आमदार आशुतोष काळेंचे आभार

शारदानगर वासीयांनी मानले आमदार आशुतोष काळेंचे आभार

शारदानगर वासीयांनी मानले आमदार आशुतोष काळेंचे आभार
जाहिरात डॉ घायतडकर

कोपरगाव विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२५कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील शारदा नगर येथील मुला मुलींच्या सोयीसाठी अत्याधुनिक असे व्यायाम साहित्य दिल्याबद्दल समस्त शारदानगर वासीयांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले आहे.

या प्रसंगी डॉ.कुणाल घायतडकर, दिग्विजय शेळके, संतोष आहेर, आप्पासाहेब मोरे, श्री भडांगे, ह भ प शिंदे महाराज, साहेबराव जाधव, सोमनाथ लोहाटे, सुनील कुटे, वैद्य सर, बाविस्कर सर, संदीप पाटील, अंभोरे साहेब, प्रीतम जाधव, सातपुते साहेब, लोहाटे ताई, डॉ भाग्यश्री घायतडकर, अश्विनीताई, रूपाली शिंदे, अंभोरे ताई, मोरे ताई, वाबळे ताई, लोहाटे ताई, जयश्री जाधव आदी शारदानगर वासियासह उपस्थित सर्व बच्चे कंपनीच्या शुभहस्ते आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या सर्व साहित्यांचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी  सर्वच बच्चे कंपनींनी नविन व्यायाम साहित्याचा मनमुराद पणे आनंद घेतला या वेळी त्यांचा चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

या प्रसंगी कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. कुणाल घायतडकर यांनी बोलताना सांगितले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून आमदार आशुतोष काळे हे जनसमान्यांचे नेतृत्व करणारे सर्व समावेशक दिलेला शब्द पाळणारे लोकप्रतिनिधी असून त्यांनी कोपरगाव शहरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासह अनेक महत्वाची कामे शहर व तालुक्याच्या दृष्टीने केले असून येणाऱ्या काळात उर्वरित सर्वच कामे पूर्ण होऊन नक्कीच संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार असल्याचे सांगत संपूर्ण शारदानगर वासियातर्फे आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले.

 

जाहिरात आत्मा
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे