आपला जिल्हा

गोदामाई प्रतिष्ठानचा उद्या साजरा होणार ३०१ वा स्वच्छता आठवडा

गोदामाई प्रतिष्ठानचा उद्या साजरा होणार ३०१ वा स्वच्छता आठवडा

गोदामाई प्रतिष्ठानचा उद्या साजरा होणार ३०१ वा स्वच्छता आठवडा

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२५कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी पात्राची गेल्या ३०० आठवड्यापासून अविरतपणे सेवा करत असलेल्या कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचा उद्या ३०१ वा स्वच्छता आठवडा साजरा होणार असल्याची माहिती गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिली आहे.

जाहिरात
कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्रा अशा गोदावरी नदी पात्रात कच- देवयानी घाट परिसरात उद्या शुक्रवारी साजरा होणाऱ्या ३०१ व्या स्वच्छता आठवड्या प्रसंगी मॅगसेस पुरस्कार विजेते वॉटर मॅन  ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. राजेंद्र सिंह हे स्वच्छता,पाणी, विसर्ग आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

जाहिरात
या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह विभाग आवर सचिव संदीप ढाकणे, उपविभागीय अधिकारी शिर्डी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे, राष्ट्रीय आयुर्वेदगुरू डॉ.रामदास आव्हाड, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय ठाणगे, लॉ कॉलेजचे संस्थापक हिरालाल महानुभव, उद्योजक मनीष कोठारी, क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, नमामि गोदाचे अध्यक्ष राजेश पंडित आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

जाहिरात
तरी जास्तीत जास्त गोदावरी नदी प्रेमींनी उद्या शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ठीक सकाळी १०.३० वाजता कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्र कच देवयांनी घाट परिसर येथे उपस्थित रहावे असे आवाहन गोदामाई प्रतिष्ठानच्या सर्व गोदावरी स्वच्छता सेवकांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे