आपला जिल्हा

मनुष्याने जीवनाचा सदुपयोग करत आपले जीवन सार्थकी करावे- महामंडलेश्वर परमानंदगिरीजी महाराज

मनुष्याने जीवनाचा सदुपयोग करत आपले जीवन सार्थकी करावे- महामंडलेश्वर परमानंदगिरीजी महाराज

ओगदी येथील गणेश गोणटे यांच्या वस्तीवर धर्मनाथ बीज उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा 
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १५ फेब्रुवारी २०२५मनुष्याचे जीवन अमूल्य असून मानवाने आपल्या जीवनाचा सदुपयोग करत आपला मानवी जन्म सार्थ करावा असा अमूल्य उपदेश परम जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे परम शिष्य परमपूज्य १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांनी केला.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील प्रतिष्ठित शेतकरी गणेश गोणटे हे गेल्या अनेक वर्षापासून धर्मनाथ बीज उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करत त्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील करत असतात याही वर्षी शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या वस्तीवर आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी छत्रपती संभाजीनगर शरणापुर येथील भांगशी माता गडाचे महंत श्री स्वामी परमानंदगिरीजी महाराजांनी उपस्थित असंख्य समुदायाला आपल्या प्रवचनातून उपदेश केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत श्री ब्रह्मानंदगिरीजी महाराज व श्री कैवल्यानंदगिरीजी महाराज उपस्थित होते.

जाहिरात
या प्रवचन सेवेत महाराजांनी पुढे उपदेश करतांना सांगितले की, मनुष्याच्या जीवनात धर्माला अत्यंत महत्त्व असून जो नीतीने वागेल त्या घरात अथवा त्या मनुष्याच्या जीवनात समृद्धी धन सुख नेहमी आनंदाने वास करत असते त्यामुळे प्रत्येक मनुष्याने नीती न्यायाने मर्यादाने व मेहनतीने धन कमवत त्या धनाचा वापर आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत त्या धनातून उरलेला काही भाग आपल्या परीने आपल्या धर्म व समाजकार्यासाठी खर्च करावा.

जाहिरात
तर तरुणांना उपदेश करताना महाराजांनी सांगितले की, तरुणांनी आपल्या तारुण्याचा वापर जीवनात चांगल्या गोष्टी करण्यासाठी करत भरपूर अभ्यास करत उच्च पदस्थ अधिकारी, मोठा व्यावसायिक व प्रगतशील शेतकरी होत आपले आपल्या गावाचे कुटुंबाचे नाव उज्वल करत फावला वेळ आपल्या धर्म व समाजकार्यासाठी खर्च करावा जो निती नियमाने वागेल त्याच्या आयुष्यात नेहमी सुखाची आनंदाची इच्छा पूर्ण होईल त्यामुळे मनुष्य जीवनात मानवाने आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत आपल्या धर्माचे कार्य करत राहावे तसेच जमेल तसे समाजकार्य देखील अविरतपणे करत राहावे असा उपदेश या प्रवचनातून श्री जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे परमशिष्य प. पु. १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांनी कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील प्रगतशील शेतकरी गणेश गोणटे यांच्या वस्तीवर सालाबाद प्रमाणे आयोजित धर्मनाथ बीज कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असंख्य भाविक भक्तांना केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे